जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंचायत समिती सभागृह, ल. ना. होशिंग विद्यालय आणि खर्डा अशा तीन ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
१५१ रक्तदात्यांनी आज रक्तदान केले.
सकाळी पंचायत समिती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. दिवसभरात पंचायत समिती- ५८, ल. ना. होशिंग-४२ आणि खर्डा येथे ५१ अशा १५१ व्यक्तींनी रक्तदान केले. यावेळी जामखेड तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे आयोजन पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक यांनी केले होते. एक चांगला सामाजिक उपक्रम राबवून पंचायत समितीने आदर्श प्रस्थापित केला आहे. तसेच अनेक सामाजिक संस्थेतर्फे पोळ यांनी सुरू केलेल्या वाचनलयास पुस्तके दिली.