गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संत निरंकारी मिशन जामखेडच्या वतीने पुस्तके भेट

0
176
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी वाचन संस्कृती वाढावी म्हणून अभिनव उपक्रम राबवत कार्यालय परिसरात वाचनालय सुरू केले याला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामसेवक व शिक्षकांनी रक्तदान शिबीराचेही आयोजन केले होते. संत निरंकारी मिशन दिल्ली शाखा जामखेड च्या वतीने वाचनालय उपक्रमास प्रोत्साहन म्हणून मिशनचे अध्यात्मिक व इतर पुस्तके भेट दिली
संत निरंकारी मिशन रजिस्टर दिल्ली शाखा ब्रांच जामखेड झोन36 अ अहमदनगर यांच्या वतीने आज दिनांक 23.10.2021 या रोजी पंचायत समिती चे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून मिशनचे अध्यात्मिक पुस्तक त्यांना भेट देण्यात आले.
 गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जामखेड येथे  पंचायत समितीमध्ये ग्रंथालय सुरू केले आहे.
     या उपक्रमा निमित्त तसेच वाढदिवसा निमित्त अध्यात्मिक  व इतर – विषयावरील पुस्तके देण्यात आली.
         यावेळी  जामखेड ब्रांचचे संचालक अमित गंभीर, श्याम, रवी जमदाडे ,सुभाष जमदाडे,मनसेचे तालुका अध्यक्ष श्री प्रदीप भाऊ टापरे, डॉ कासम शेख, सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद ,सुनील जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here