जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
सुमारे दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती तसेच महामंडळाच्या बस पण बंद होत्या आता परिसरातील कोरोनाची परिस्थिती बर्यापैकी निवळली आहे. शाळा व महाविद्यालये पण सुरू झालेली आहेत विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ताबडतोब बस सुरु करावी असे निवेदन साकत ग्रामपंचायतच्या वतीने
सरपंच हनुमंत पाटील यांनी जामखेड आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
जामखेड साकत बस सुरू झाल्यास धोत्री, सावरगाव, साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी येथील विद्यार्थी व नागरिकांची सोय होईल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी महामंडळाने लवकर बस सुरू करावी अशी मागणी सरपंच हनुमंत पाटील यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरीकांची अडचण लक्षात घेता लवकरात लवकर बस सुरू करण्यात येईल असे आगारप्रमुख शिरसाठ साहेबांनी सांगितले याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांनी बसचाच प्रवासासाठी वापर करावा जेणे करूण महामंडळाचे उत्पन्न वाढेल व विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावेत म्हणजे पुर्वीप्रमाणे सर्व बस सुरू होतील
चौकट
सध्या महामंडळ मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. सध्या डिझेलची टंचाई आहे जामखेड आगारासाठी आठवड्याला दोन टॅकर डिझेल लागते सध्या एकच टॅकर डिझेल येत आहे त्यामुळे सध्या फक्त लाॅगरूटच्या बस सुरू आहेत. डिझेलचा पुरवठा व्यवस्थित झाल्यावर सर्व बस सुरू होतील. आगार प्रमुख शिरसाठ साहेब
चौकट
ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही आमदार रोहित पवारांना भेटून यातुन लवकरात लवकर मार्ग काढू
सरपंच हनुमंत पाटील साकत