Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड येथे चांदणझुला कविसंमेलन शनिवारी रंगणार – प्रा आ. य पवार

जामखेड येथे चांदणझुला कविसंमेलन शनिवारी रंगणार – प्रा आ. य पवार

0
244
जामखेड  प्रतिनिधी
               जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे वतीने शनिवार दि.२३आक्टोबर२०२१रोजी रात्री आठ ते दहा या वेळेत नामवंतांचे कविसंमेलन चांदणझुला साजरे होत आहे. बीड, नगर, लातूर, नांदेड, सोलापूर, बारामती, येथील नामवंत कवी, कवयित्रींचा संमेलनात सहभाग असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ. य. पवार व कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी दिली.
                         ADVERTISEMENT
    यावेळी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.चांदणझुला कविसंमेलनाचे हे सहावे वर्ष आहे.कोरोनाचे नियम पाळून चांदणझुला साजरा होत आहे. शालेय व  विद्यापीठीय पाठ्यक्रमाचे मान्यवर कवींचा या कविसंमेलनात सहभाग असून तहसील कार्यालय परिसरात संमेलन होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ शत्रुघ्न कदम  व खजिनदार डॉ
जतीन काजळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!