Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या पती पत्नीचे भांडण स्वतःच्या घर जाळताना दहा घरे जळाली!!!

पती पत्नीचे भांडण स्वतःच्या घर जाळताना दहा घरे जळाली!!!

0
268
जामखेड न्युज – – – 
 पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचं घर जाळताना
आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाहून अधिक किमतीचे
नुकसान झाले आहे. पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
                         ADVERTISEMENT
 
पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली.आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रौद्ररुप धारण
करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला. ही सर्व घरे
दरम्यान, आरोपी पती संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मल्हारपेठ पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. जाळपोळ करणाऱ्या पतीला ग्रामस्थांनी मात्र आगीतून
बाहेर काढत चांगला चोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!