जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
पेट्रोल व डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सर्व सामान्य लोकांना गाड्या वापरणे परवडत नाही तसेच सध्या मोठय़ा प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. तेव्हा प्रदुषण कमी करण्यासाठी पैशाची बचत म्हणजे पर्यावरण पुरक व इंधन बचत करणारी पर्यावरण पुरक ई- बाईकचा वापर हि काळाजी गरज आहे. असे मत आमदार रोहित पवार यांची व्यक्त केले.
कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांच्या प्रमुख उपस्थित व हभप कैलास भोरे महाराज यांच्या आशिर्वादाने जामखेड येथे उत्कर्ष ई व्हेईकल या इमीक कंपनीचे अधिकृत डिलर त्रिबक कुमटकर यांच्या बॅटरीवर चालणाऱ्या दोन चाकी गाड्यांच्या शोरूमचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित जामखेड येथे सपन्न झाला
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उत्कर्ष मिल्क अॅड अॅग्रो प्रोडक्टचे चेअरमन त्रिबक प्रल्हाद कुमटकर यांचे चिरंजीव उत्कर्ष कुमटकर यांच्या उत्कर्ष ई व्हेईकल या इलेट्रीक बाईकच्या शोरूमचा शुभारंभ कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते व हभप कैलास भोरे महाराज यांच्या आशिर्वादाने मोठया उत्साहात मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी जामखेडचे सुपुत्र तथा इमीक कंपनीचे डायरेक्टर संतोष पवार प्रामुख्याने उपस्थित होते कंपनीने सुरू केलेल्या या व्यवसायाबद्दल त्यांनी उपस्थितांना सवीस्तर मार्गदर्शन केले तसेच योग्यजागा व औद्योगीक वसाहत जामखेड मध्ये झाल्यास आपण या व्यवसायाची सुरवात जामखेडमध्ये ही करू अशी ग्वाही दिली आमदार पवार यानी आपण पुरेपुर सहकार्य करण्याचा प्रयत्न करु तसेच अशा व्यवसायाची या काळात गरज असुन उत्कर्ष ई व्हेईकल च्या माध्यमातुन ज्या दुचाकी आहेत त्याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा असे सांगत उत्कर्ष ई व्हेईकल शोरूमच्या या शोरुमला शुभेच्छा दिल्या
या वेळी ह भ प कैलास भोरे महाराज राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुकर राळेभात विजय सिंह गोलेकर सभापती सुर्यकांत नाना मोरे कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले राजे द्र कोठारी संजय कारले इमीक कंपनीचे डायरेक्टर संतोष पवार लेखा परिक्षक विक्रम मेंगडे उद्योजक संजय पवार सह मान्यवर व्यापारी मित्र परिवार बहुसंखेने उपस्थित होता.






