Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या नाशिक विभागात 9 लाख 65 हजार 05 रुग्ण कोरोनामुक्त- विभागातील रुग्ण बरे...

नाशिक विभागात 9 लाख 65 हजार 05 रुग्ण कोरोनामुक्त- विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के तर मृत्युदर 2.00 टक्के

0
213
जामखेड न्युज – – – 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.  विभागात आजपर्यंत 9 लाख 88 हजार 397 रुग्णांपैकी 9 लाख 65 हजार 05 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 3 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 70 लाख 68 हजार 510 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 88  हजार 397 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. गांडाळ यांनी दिली आहे.
*नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के*
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 09 हजार 322  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 99 हजार 896  रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच  778  रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 648 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11  टक्के आहे .
*अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के*
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 50 हजार 227 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 40 हजार 531 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2 हजार 762  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के इतके आहे. आजपर्यंत 6 हजार 934 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.97 टक्के आहे.
*धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के*
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 880 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 45 हजार 154 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 06 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41  टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.45 टक्के आहे.
*जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के*
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 40 हजार 169  रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच  12 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के इतके आहे. आजपर्यंत 2 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.80 टक्के आहे.
*नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के*
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 209 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 255 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 02 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62  टक्के इतके आहे. आजपर्यंत 951  रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.36 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!