जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
भारतातील सर्वात उंच असणार्या स्वराज्य ध्वजाचे जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्साहात स्वागत केले.रस्त्याच्या दुतर्फा सर्व विद्यार्थीनींनी रांगोळी काढून स्वराज्य ध्वजास अभिवादन केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दुतर्फा रांगेत थांबून अत्यंत शिस्तमय वातावरणात स्वराज्य ध्वजावर पुष्पवृष्टी केली.स्वराज्य ध्वजाचे तेलंगशी गावात सामूहिक पूजन केल्यानंतर शाळेच्या बालचमूंनी इतिहासाचे रंग रुप हे आले या नगरा , हे सुंदर असे स्वागत गीत गाऊन स्वराज्य ध्वजाचे व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या या सर्व कलागुणांचे कौतुक आ.रोहित (दादा) पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार,तेलंगशी सरपंच नवनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय यांनी केले. विशेष म्हणजे स्वराज्य ध्वज स्थापनेसाठी प्रत्येक गावातून नेण्यात येणार्या मातीचे हस्तपूजन तेलंगशी शाळेच्या विद्यार्थींनी व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अनंता गायकवाड, पदवीधर शिक्षक संतोष गोरे, सुशेन चेंटमपल्ले, विजयकुमार रेणुके व श्रीम.लक्ष्मी जायभाय यांनी विशेष परिश्रम घेतले.






