जिद्द-मेहनत -चिकाटी असेल तर यश मिळतेच – न्यायाधीश सपकाळ

0
240
जामखेड प्रतिनिधी
अपयशाने न खचता  प्रयत्नात सातत्य ठेवावे ,जिद्द मेहनत चिकाटी असेल तर यश मिळतेच, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद संपुर्ण देशाला वंदनीय आहेत असे मनोगत रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय  जामखेड मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती – युवा दिन निमित्त  न्यायाधीश पी.व्ही. सपकाळ यांनी केले.
प्रमुख उपस्थिती माननीय श्री सपकाळ साहेब- न्यायाधीश जामखेड , मा.उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशीद
स्कुल कमिटीचे मा श्री हरिभाऊ बेलेकर,प्राचार्य श्री हरिभाऊ ढवळे, प्रा प्रकाश तांबे, दत्तात्रय ढाळे , सौ विमल जगताप ,प्रा रमेश बोलभट, एनसीसी ऑफिसर मयुर भोसल आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या वतीने न्यायाधीश पी.व्ही सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच लातूर तेथे  सहा कि.मी धावणे स्पर्धेमध्ये प्रथम आलेला व  राज्यपातळीवर निवड झालेल्या अजय आबासाहेब म्हेत्रे  याचा मेडल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
    न्यायाधीश सपकाळ  यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली  व  आपले विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रभावित केले. ज्या थोर व्यक्ती शास्त्रज्ञ  त्यांनी अनेक प्रयत्नातून यश साध्य केले आहे त्यामुळे आपणही अपयशाला खचून न जाता सतत प्रयत्न करत रहावे व  जिद्द चिकाटी मेहनत असेल तर यश मिळतेच असे मनोगत व्यक्त केले.
 बबन काशीद यांनी संस्कारक्षम मल्ल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्र संचलन रमेश बोलभट व आभार मयुर भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here