अवैध दारू विक्री व झुगाऱ्यांवर जामखेड पोलीसांची धडक कारवाई सतरा जणांवर गुन्हा दाखल 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
174

जामखेड तालुक्यातील खर्डा भागात जुगार अड्डा
सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर जामखेड
पोलिसांच्या पथकाने खर्डा गावात आज 12 रोजी
धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याची
कारवाई केली. या कारवाईत सुमारे 25 हजार
रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त
करण्यात आले आहे. जामखेड पोलिसांत गोरख
बबन खोबरे, सुरज तेजसिंग भागडे , प्रविण बबन
राऊत ( सर्व राहणार खर्डा ) पद्माकर पांडुरंग काळे
(धनेगाव), महाविर बबन तादगे ( रा दौंडाचीवाडी)
बापु भास्कर पवार ( रा अंतरवली भूम) या सहा
जणांविरोधात जुगार कायद्यान्वे गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत. दरम्यान अटक करण्यात
आलेल्या या
सहा जुगाऱ्यांना वैयक्तिक
जातमुचलक्यावर सोडून देण्यात आले.दरम्यान
जामखेड पोलिसांनी अवैध्य व्यवसायासह जुगार
अड्ड्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू
ठेवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here