पाटोदा प्रतिनिधी
जामखेड तालुक्याच्या शेजारी असलेल्या
बीड जिल्ह्यातील व पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे गेल्या चार दिवसात तब्बल 26 हुन अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.मात्र हा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे आज मिळालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.यासंदर्भातील माहिती बीडचे पशुसंवर्धन आयुक्त रवी सुरेवाड यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे चार दिवसांपूर्वी 11 कावळे मेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही घटना पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
पाटोदा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली.
त्यातील 3 कावळ्याचे नमुने पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यात आले.उर्वरित कावळ्यांना पुरून टाकण्यात आले. ही संख्या वाढत जाऊन 26 कावळ्याचा मृत्यू झाला आहे.
या भागातील कावळे मूर्च्छा येऊन पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागास कळविण्यात आले.
त्यांतर पाटोदा पशुसंवर्धन विभागाचे डॉ. राख यांच्या टीमने या भागातील कावळ्यांचे नमुने तपासले. यातील तीन कावळ्यांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या नमुन्यांचा अहवाल आला असून त्यामध्ये या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू ने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे चिकन खाणार्यांनी खबरदारी घ्यावी.
बर्ड फ्लू संदर्भात उपाययोजना
खबरदारीचा उपाय म्हणून मुगगाव सह १० किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे नमुने गोळा केले जात आहे.
बीड जिल्ह्यात ११ टीम तयार करण्यात आल्या असून जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म वर लक्ष ठेऊन आहेत. असे पशुसंवर्धन आयुक्त रवी सुरेवाड यांनी सांगितले.