विकास कामाच्या बळावर श्री साकेश्वर जनसेवा पॅनल विजयाची हॅटट्रिक करणार – माजी सरपंच हनुमंत पाटील

0
172
जामखेड प्रतिनिधी
साकत गाव विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित होते मात्र मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही विकासाची गंगा गावात आणली या विकासाच्या जोरावरच साकेश्वर जनसेवा पॅनल ही निवडणूक लढवत आहे. आम्ही विकास करत आसताना विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. गावातील लोकांना विकास करणारे कोण व फक्त निवडणुकीत दिसणारे खोटे आश्वासने देणारे कोण हे चांगले माहित आहे.  ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही गावचा विकास केला आणी त्यामुळेच साकेश्वर जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील असा आशावाद माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी व्यक्त केला.
    साकेश्वर जनसेवा पॅनलच्या प्रचार सभेत हनुमंत पाटील बोलत होते. यावेळी पॅनेल प्रमुख माजी सभापती भगवान मुरुमकर, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव घोलप, जालिंदर नेमाने, श्रीराम घोडेस्वार, रामहारी नेमाने दिलीप घोलप, भास्कर वराट,
सागर मुरूमकर, मिनल घोडेस्वार, राजेंद्र मुरूमकर, ज्ञानेश्वर लहाने,संजय बापु मुरूमकर, साहेबराव कडभने (चेअरमन),बाळासाहेब वराट,गहिनाथ पुलवळे, सुनिल पुलवळे व पॅनेलचे उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   यावेळी बोलताना पाटील म्हणाले की,
केलेल्या विकास कामांमुळे जनता श्री साकेश्वर जनसेवा पॅनल बरोबर आहे. विरोधकही सत्तेत होते. त्यांनी गावासाठी कोणते भरीव काम केले ते सांगावे एकही काम त्यांच्या कडे सांगण्यासारखे नाही. फक्त निवडणुकीत दिसणारे परत गायब असतात त्यामुळे श्री साकेश्वर जनसेवा संपुर्ण पॅनल बहुमताने निवडून येणार आहे असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here