संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली जामखेड शाखेच्या वतीने अमरधाम परिसरात स्वच्छता अभियान

0
173
जामखेड प्रतिनिधी
शहरातील तपनेश्‍वर येथील अमरधाम मध्ये मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे, गवत काटे कुटे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झालेली होती हि गोष्ट संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट च्या लक्षात येताच आज सकाळी ८ वाजता स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे  तीन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
यावेळी संत निरंकारी सेवा  चॅरीटेबल ट्रस्ट रजि ,दिल्ली शाखा जामखेड चे तालुका समन्वयक अमित गंभीर, नगरसेवक दिगबर चव्हाण, अमोल गिरमे, रवि जमदाडे, दिपक मोरे, लक्ष्मण ढेपे सर, शाम जमदाडे, कृष्णा गिते, विकास साबळे, अखिलेश डाडर व महिला रश्मी गंभीर, रेखा गंभीर, वंदनाताई राळेभात ,सूर्यवंशी, जाधव  इत्यादी सेवेकरी उपस्थित होते .
अमरधाम (स्मशानभुमी )परिसरात मोठ्या प्रमाणात छोटी चिमुकली काटे,मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे होती .
परिसर अस्वच्छ झाला होता. अस्वच्छतेमुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात सर्वानी स्वच्छतेची सवय अंगी बाळगणे आवश्यक आहे. स्वच्छतेची सुरूवात स्वतः पासून प्रत्येकाने करावी.
भारत सरकारच्या स्वच्छ अभियान मध्ये देशभरात या उपक्रमास भरपूर प्रतिसाद असल्यामुळे  हे सामाजिक उपक्रम हाती घेतला. याच भावनेतून आपण  मंडळाच्या सहभागाने हा परिसर स्वच्छ करीत आहे. असे तालुका समन्वयक अमित गंभीर बोलत होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here