ग्लोबल टिचर प्राईज विजेते रणजितसिंह डिसले यांच्याशी नगर जिल्हा शिक्षण विभाग व 47 देशांतील शिक्षण तज्ञांनी साधला संवाद

0
217
जामखेड प्रतिनिधी
 दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी ग्लोबल नगरी परिवार  अमेरिका व शिक्षण विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक किर्तीचे ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार विजेते शिक्षक रणजीतसिंहजी डिसले सर यांच्याबरोबर  व्हिडिओ कॉन्फेरेंसिंग च्या माध्यमातून संवाद साधन्यात आला.
यावेळी राज्याचे शिक्षण सहसंचालक आदरणीय दिनकर टेमकर, ग्लोबल नगरी अमेरिकाचे संयोजक  किशोरदादा गोरे , जिल्हा परिषद अहमदनगरचे शिक्षणाधिकारी  शिवाजी शिंदे  तसेच ग्लोबल नगरीचे जगातील विविध 47  देशांतील सभासद व उपक्रमशील शिक्षक सहभागी झाले होते.
सर्वांनी रणजीतसिंह डिसले सरांचा शैक्षणिक प्रवास जाणून घेवून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला व सरांनी सर्वांना समर्पक उत्तरे दिली. सर्वांनी रणजीत सरांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आदरणीय शिक्षणाधिकारी  शिवाजी शिंदे  यांच्या रणजीत सर आपने तो मौसम बदल दिया या वाक्याला सर्वांनी भरभरुन दाद दिली.आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सर्वांशी संवाद साधल्याबद्दल आदरणीय डिसले सरांचे मनःपूर्वक आभार मानले.
    जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी गेल्या चार वर्षांपासून रविंद्र भापकर हे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम राबवत असतात. हा परिसंवाद आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रविंद्र भापकर व ग्लोबल नगरीचे रोहित काळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here