राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन – मंगेश (दादा) आजबे

0
237
जामखेड प्रतिनिधी
ज्या शूर स्त्री – पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात
अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक
यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृत्याचे कितीही अभिनंदन
केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे.
थोर विभुतीचा आदर्श पुढच्या पिढीने घ्यावा म्हणून
राष्ट्र निर्माण करणार्‍या थोर राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता
जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
      यावेळी मंगेश ( दादा ) आजबे यांनी जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, ज्या मातेने दोन छत्रपती घडविले हिंदवी स्वराज्य निर्माणचे कार्य केले तसेच विवेकानंदांनी जगात आपल्या देशाचे नाव नेले अशा थोर व्यक्तींचा आदर्श तरूणांनी घ्यावा तसेच म्हणून जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच सध्या कोरोना महामारी मुळे सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. तो भरून काढण्यासाठी जयंती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन मंगेश दादा आजबे यांनी केले.
     सकाळी दहा वाजता प्रतिमा पुजन करून सकाळी दहा वाजता मंगेश कन्स्ट्रक्शन जामखेड येते रक्तदान शिबीरास सुरूवात होईल असे आजबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here