जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वात मोठ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास बीड रोडवरून जाणारा जवळचा मार्ग पंचवीस वर्षापासून बंद होता. यामुळे एक किलोमीटर वळसा घालून विद्यार्थ्यांना शाळा काॅलेजला जावे लागत होते. यामुळे मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागत होता. सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योगपती रमेश आजबे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मोकळा झाला व त्यांनी स्वखर्चातून मुरमीकरण करून दिल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यातील एक प्रतिष्ठित व मोठी शाळा म्हणून ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे.
सुमारे ३१०० मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. तर महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थी आहेत. साकत, सौताडा, सावरगाव, मोहा, भुतवडा तसेच पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमधील मुले याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात खाजगी वाहने व बस बीड रोडवर थांबतात मुलांना थेट तहसिल कार्यालयाकडून शाळा काॅलेजला विद्यार्थी व विद्यार्थिनीना जावे लागत होते. एकाच रस्त्याने जावे लागत असल्याने मोठी गर्दी होत होती. तसेच या रस्त्यावर गर्दीमुळे छेडछाडीचे प्रकार वारंवार घडत होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून हा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. ही अडचण सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती रमेश आजबे यांच्या लक्षात आली त्यांनी कागदपत्राची पडताळणी केली. सरकारी दप्तरात योग्य नोंद असल्यामुळे सर्व पाठपुरावा करून स्वत हा रस्ता मोकळा केला बीड रोडवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा रस्ता जवळ झाला एक ते दीड किलोमीटर अंतर वाचले यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ल. ना. होशिंग विद्यालयानेही नगरपरिषदेकडे रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून मागणी केली होती. पण विद्यालयाच्या मागणीला प्रशासन दाद देत नव्हते. ग्रामीण रुग्णालय व गांधी यांच्या मधुन साडे सहा फुटाची नोंद सरकारी दप्तरात नोंद असणारा हा रस्ता पंचवीस वर्षापासून बंद होता. प्रसिद्ध उद्योगपती रमेश आजबे यांनी प्रयत्न करून व स्वखर्चातून हा रस्ता मोकळा केला काटेरी झाडे झुडपे टोडून रस्त्यावर मुरमीकरण केले. व पेव्हिंग ब्लाॅक टाळल्यामुळे सुमारे पाच हजार विद्यार्थी व नागरिकांची सोय झाली आहे
तसेच हा रस्ता फक्त पायी चालणाऱ्यांसाठीच असेल मोटारसायकलला येथे प्रवेश नसेल असेही सांगितले.
विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला व आजबे यांचे आभार मानले
यावेळी अंगद सांगळे, दादासाहेब ढवळे, पिंटु इंगोले, नितीन सपकाळ, बिभिषण कदम, सागर कोल्हे, राजू आजबे यांनी आजबे यांना मदत केली.