अरणगाव ग्रामपंचायत निवडणूक जनशक्ती विरोधी आठमुठशाही आहे त्यामुळे श्री अरणेश्वर जनसेवा पॅनल बहुमताने विजयी होणार आहे – संतोष निगुडे

0
286

जामखेड प्रतिनिधी

 अरणगाव निवडणूक जनशक्ती विरोधी आठमुठशाही अशी आहे आम्ही बिनविरोध ग्रामपंचायत निवड साठी व गावाला तीस लाखांचा निधी मिळवण्यासाठी खुप प्रयत्न केला पण विरोधकांनी तो प्रयत्न हाणून पाडला व गावावर निवडणूक लादली. आम्ही संपूर्ण गावाच्या विचाराने उमेदवार निवडले विरोधकांना उमेदवार मिळाले नाहीत दमबाजी करत दारू पाजून व स्वतः च्या घरातील दोन उमेदवार देऊनही सर्व जागेवर उमेदवार उभे करता आले नाहीत. असे मत श्री अरणेश्वर पॅनलचे प्रमुख प्रमुख संतोष निगुडे यांनी सांगितले.
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी अरणगाव ग्रामपंचायत निवडणूकीत अरणेश्वर जनसेवा पॅनल प्रमुख संतोष निगुडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पाच वर्षांत विरोधकांची सत्ता आसताना
जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला आम्ही आमदार रोहित पवार यांच्या बिनविरोध ग्रामपंचायत झाली तर तीस लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी आम्ही सर्व गावाची बैठक घेतली सर्वानी उमेदवार निश्चित केले पण विरोधकांनी यात खोडा घातला व गावावर निवडणूक लादली त्यामुळे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत.
    यावेळी बोलताना शंकर गदादे म्हणाले की, आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही पॅनल बनविला आहे. विरोधकांनी लोकांना दमबाजी करत दारू पाजून उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला पण तरिही सर्व जागेवर उमेदवार उभे करता आले नाहीत घरातील दोन उमेदवार उभे केले आहेत. विरोधकांनी पाच वर्षांत गावाचा विकास केला नाही पण स्वतः चा मात्र खुपच विकास केला. पाच वर्षात एकही ग्रामसभा घेतली नाही फक्त कागदपत्रे रंगवली. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहोत. आमचा विजय निश्चित आहे.
लोक
  श्री अरणेश्वर जनसेवा पॅनलचे उमेदवार
प्रभाग एक- शेख फकिर, राऊत शहाबाई, शिंदे दिपाली
प्रभाग दोन- निगुडे तात्यासाहेब, पारे संजय, पारे गजराबाई
प्रभाग तीन – निगुडे संतोष, गदादे रूपाली
प्रभाग चार – पवार अविनाश, डमाळे अनिता, नन्नवरे राजाबाई असे अकरा उमेदवार उभे आहेत.
  आम्ही आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली
तसेच पांडुरंग सोले, रामदास ( बापू मामा) गदादे, नवनाथ ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्री अरणेश्वर जनसेवा पॅनल उभा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here