जामखेड प्रतिनिधी
ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आसताना सोळा लाख रुपयांचे कर्ज करून ठेवले होते. पाच वर्षांत आमची सत्ता आसताना गावाच्या सर्वागिण विकासाबरोबरच स्मार्टग्राम व पाणी फाउंडेशन असे तेरा लाख रुपयांचे बक्षिस मिळवले त्यामुळे श्री अरणेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने निवडून येतील असा विश्वास पॅनल प्रमुख लहू शिंदे यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना लहू शिंदे म्हणाले की, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांत रस्ते, वीज व पाणी याबाबत गावाला स्वयंपूर्ण बनविले मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एक कोटी रुपयांचा निधी आणुन पिण्याच्या पाण्याची सोय केली आता गावासाठी पाच रूपयांमध्ये वीस लीटर शुध्द आरोचे पाणी मिळत आहे. गाव कचरा मुक्त करण्यासाठी घंटागाडी सुरू केली तसेच गावाचे चोरांपासून संरक्षण करण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तसेच जलयुक्त शिवार च्या माध्यमातून नदी ओढे खोलीकरण करून गावांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली त्यामुळे गाव टॅकर मुक्त झाले तसेच गाव डिजिटल बनवले रस्ते वीज व पाण्याबाबत गाव स्वयंपूर्ण बनविले त्यामुळे आमच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

आमच्या श्री अरणेश्वर ग्रामविकास पॅनलचे प्रभाग एक सविता राऊत, रमजान शेख, जनाबाई शिंदे
प्रभाग दोन मध्ये रविद्र निगुडे, सुशिला पारे, रावसाहेब पारे
प्रभाग तीन अंकुश शिंदे, मिराबाई नन्नवरे
प्रभाग चार मध्ये ऊर्मिला नन्नवरे, बबन पवार असे उमेदवार आहेत सर्वच उमेदवार पाच वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे बहुमताने निवडून येणार आहेत असे लहू शिंदे यांनी सांगितले.