ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री प्रा राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आमनेसामने

0
242

 

जामखेड प्रतिनिधी

गेल्या एक वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारचा कसलाच विकास नसून मतदारसंघ भकास झाला आहे.
तालुक्यात आता विधानसभा निवडणुकीत केलेला भुलभुलैय्या ग्रामपंचायत निवडणुकीत चालणार नाही. असा टोला माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना नाव न घेता लावला.

जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहे. गावागावात राजकीय भावकी आमनेसामने लढत आहे. खर्डा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ दि. ८ रोजी राम शिंदे यांच्या हस्ते फोडला व गावात भव्य रॅली काढण्यात आली होती. पुढे पत्रकारांशी बोलताना राम शिंदे म्हणाले की गेल्या दीड वर्षात जामखेड तालुक्यात काय दिवे लावले ते जनते समोर आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांना हूल बसली आहे. हूल देऊन मतदान घेतले. दीड वर्षात प्रचिती आली आहे, या प्रचीतीच्या माध्यमातून आता ग्रामपंचायत निवडणुकीत जनता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वला पुन्हा संधी देईल असा विश्वास प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केला.एकमेकांना खाली बसवायचे समाज गुंड म्हणून स्वतःला संबोधायचे, काही ग्रामपंचायत बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न मतदार सफल होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत जनतेत केलेला भुलभुलैया मात्र आता या ग्रामपंचायत निवडणुकीत चालणार नाही असे देखिल शिंदे म्हणाले.
भाजपच्या काळात खर्डा येथील सिताराम गडाचा विकास,
प्राथमिक आरोग्य केंद्र, पांढरेवाडी तलाव, रस्ते, अंतर्गत
गटार, या सह एकुणच खर्डा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर
विकास कामे केली आहेत. त्यामुळे भाजपाच्या ताब्यात
ग्रामपंचायत येणार यात शंका नाही. या संपूर्ण खर्डा शहरात
माजी मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात
भव्य अशी रॅली काढण्यात आली होती.
या प्रचार रॅलीमध्ये पंचायत समितीचे उपसभापती रवी
सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिंवसरा, मदन पाटील, वैजीनाथ पाटील, बाजीराव गोपाळघरे, केशव वनवे, बाबा सुरवसे, सुरेश नन्नवरे, मनोज पाटील, जालिंदर सूरवसे, शरद येवले, उपस्थितीत होते. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या सतरा सदस्यांचे असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले. तर महाविकास आघाडी परस्कत खर्डा ग्रामविकास आघाडी या प्रमख दोन पॅनल मध्ये खरी लढत आहे.

याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ही प्रचाराचा नारळ फोडला यावेळी भव्य रॅली काढून प्रचार सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करताना पवार यांनी शिंदे यांच्याटीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, ‘निवडणुका बिनविरोध करण्याचा माझा मूळ विचार विरोधकांना पटलाच नाही. गावात गटबाजी नको, लोकांनी एकत्र येऊन विकासाला चालना द्यावी, असा माझा विचार होता. मात्र, ज्यांचे राजकारण गटबाजी करून पोळी भाजण्याचे आहे, त्यांना हे समजणार नाही. गेल्या अनेक
वर्षांपासून या मतदारसंघात सामान्यांचा आवाज दडपून टाकून निवडणुका घेण्याची पद्धत पडली आहे. आता हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ‘सामाजिक गुंड’ कोणी नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ द्याव्यात, त्यातच सर्वांचे भले आहे,’ असेही पवार यांनी सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here