भूमापन पध्दतीत ड्रोन सर्वेक्षणामुळे होणार क्रांती!!!

0
218
जामखेड न्युज – – 
 बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता अचूकता येत असून कमी वेळ व श्रमात अधिक अचूक काम होऊ लागले आहे. ग्रामीण भागात भूमापन हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला असून आता भूमापनासाठी ड्रोनचा वापर होऊ लागल्याने अनेक समीकरणे बदलून जातील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
बारामती तालुक्यातील कटफळ येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाच्या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येणार असून प्रत्येक धारकाच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या माध्यमातून सीमा निश्चित होतील, त्याचा फायदा वैयक्तिक धारकासह ग्रामपंचायतीला होणार आहे. बारामतीत 53 गावांचे होणार भूमापनबारामती तालुक्यात एकूण 118 गावे असून यापूर्वी 47 गावांचे नगर भूमापन झालेले असून उर्वरित 71 गावांपैकी 18 गावे यांना मूळ गावठाण नाही त्यामुळे फक्त 53 गावांचे नगर भूमापन करण्यात येऊन त्यांना मिळकत पत्रिका देण्यात येतील – गणेश कराड, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, बारामती.
गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेची वैशिष्ट्ये प्रत्येक धारकांच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या निमित्तानं सीमा निश्चित होतील आणि मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.प्रत्येक धारकाला मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका आणि सनद मिळेल.गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेत शेतीच्या 7/12 प्रमाणेच धारकाच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळणार आहे.मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होईल, तारण करता येईल, जामिनीचा मालक म्हणून राहता येईल, विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहे. सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतींचे संरक्षण करता येईल.गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्कांबाबत व हद्दींबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
योजनेमुळे ग्रामपंचायतींना होणारे फायदे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल.ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. ग्रामपंचायत हददीतील मालमत्ता मालमत्ताकराच्या व्याप्तीत येतील, त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात
 वाढग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्रक (नमुना नोंदवही) आपोआप, स्वयंचलनाने तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज, पारदर्शक आणि सुलभ होईल. गावठाणाच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती आणि सार्वजनिक मिळकती, जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित होतील. ते जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here