Monday, October 19, 2026
Home शैक्षणिक बातम्या जामखेड महाविद्यालयाची मैदानावर सुवर्णभरारी! ॲथलेटिक्स स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य अन्...

जामखेड महाविद्यालयाची मैदानावर सुवर्णभरारी! ॲथलेटिक्स स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य अन् ३ कांस्य पदकांची कमाई, खेळाडूंच्या यशाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला!

0
4
जामखेड महाविद्यालयाची मैदानावर सुवर्णभरारी!  ॲथलेटिक्स स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य अन् ३ कांस्य पदकांची कमाई, खेळाडूंच्या यशाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला!

जामखेड न्युज – – – – 

जामखेड महाविद्यालयाची मैदानावर सुवर्णभरारी!

ॲथलेटिक्स स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य अन् ३ कांस्य पदकांची कमाई, खेळाडूंच्या यशाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली आहे. यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश असून, खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर येथे १८ व १९ ऑक्टोबर रोजी दोन दिवस ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

🥇 सुवर्णपदक विजेते
गौरव रासणे – २० किलोमीटर चालणे
उपेश धनलगडे – थाळीफेक
🥈 रौप्यपदक विजेते
सिद्धी पठाडे – १० किलोमीटर धावणे
उपेश धनलगडे – गोळाफेक
🥉 कांस्यपदक विजेते
रुपाली निकम – हातोडाफेक
राखी भिसे – २० किलोमीटर चालणे
ऋषिकेश धनलगडे – थाळीफेक
या स्पर्धेत गौरव रासणे याने २० किलोमीटर चालण्याच्या प्रकारात, तर उपेश धनलगडे याने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक पटकावून विशेष कामगिरी केली. उपेश धनलगडे याने गोळाफेकमध्येही रौप्यपदक मिळवत एकाच स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली. सिद्धी पठाडे, रुपाली निकम, राखी भिसे आणि ऋषिकेश धनलगडे यांनीही पदके मिळवत महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.

क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाला यश
या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन यामुळे महाविद्यालयाला हे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम केळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे व क्रीडा विभागप्रमुखांचे अभिनंदन केले.
जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश महाविद्यालयातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारे असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!