Monday, October 19, 2026
Home ताज्या बातम्या माजी नगरसेवक बिबीषण मामा धनवडे यांच्या प्रयत्नांतून साकारलेले आई तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी...

माजी नगरसेवक बिबीषण मामा धनवडे यांच्या प्रयत्नांतून साकारलेले आई तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी खुले, अभिषेकासाठी संपर्क साधा!

0
2
माजी नगरसेवक बिबीषण मामा धनवडे यांच्या प्रयत्नांतून साकारलेले आई तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी खुले, अभिषेकासाठी संपर्क साधा!

जामखेड न्युज – – – – – 

माजी नगरसेवक बिबीषण मामा धनवडे यांच्या प्रयत्नांतून साकारलेले आई तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी खुले, अभिषेकासाठी संपर्क साधा!

जामखेड शहरातील आई तुळजाभवानी मंदिरात भाविकांना देवीचा अभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आई तुळजाभवानीच्या चरणी अभिषेक करून धार्मिक विधी करण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी ही एक चांगली संधी आहे. अभिषेकाचा संपूर्ण खर्च ५५० रुपये असून, पूजेचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात.

माजी नगरसेवक बिबीषण मामा धनवडे यांच्या विशेष प्रयत्नांतून आई तुळजाभवानी मंदिर साकार झाले आहे. या मंदिरातील सिंहासनावर १४ मे २००६ रोजी आई तुळजाभवानीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून मंदिरात धार्मिक परंपरा आणि पूजाविधी सुरू आहेत.

पंचामृत घेऊन या; पूजेचे साहित्य मंदिर समितीकडून!
आई तुळजाभवानीचा अभिषेक करू इच्छिणाऱ्या भाविकांनी मंदिरात येताना पंचामृत सोबत आणावे. अभिषेकासाठी आवश्यक असलेले हार, ब्राह्मण तसेच इतर पूजेचे साहित्य मंदिर समितीकडून उपलब्ध करून दिले जाते. अभिषेकाचा संपूर्ण खर्च ५५० रुपये असल्याने भाविकांना पूजेचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.

अभिषेकासाठी येथे साधा संपर्क
जामखेड शहरातील तसेच परिसरातील आई तुळजाभवानी भक्तांनी अभिषेक करण्यासाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.
वराट दाजी : ९०२१४६५५५५
वराट ताई : ९०२१२९५५५५
काळे देवा : ९१५८५५०२७२
स्वप्निल : ९०२१७९६१७३
आई तुळजाभवानीच्या भक्तांनी या सुविधेचा लाभ घेऊन देवीच्या चरणी अभिषेक व पूजाविधी करण्यासाठी मंदिरात यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!