जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
एनएमएमएस पात्र विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये
नुकताच सोशल डिस्टंस व सँनिटायझर चा वापर करून संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी शशिकांत देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी होते. यावेळी प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी एनएमएमएस यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. सर्व स्पर्धा परीक्षा यांची जास्तीत जास्त तयारी करून घेतली जाईल जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी होतील असे नियोजन केले जाईल. त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतांना
संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी सतत अशा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे.जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल व पुढील परीक्षा देताना त्याचा निश्चित उपयोग होईल.त्याचबरोबर महत्वाचा भाग म्हणजे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून विद्यालयाचे, संस्थेचे नाव मोठे करावे याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व यश प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
त्यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, शिक्षक प्रतिनिधी राघवेंद्र धनलगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमासाठी संजय कदम व समारंभ समिती यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वराट यांनी तर सूत्रसंचालन अनिल देडे व आभार राघवेंद्र धनलगडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.