जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील कारंडे वस्ती येथील अनिकेत विठ्ठल बांगर (वय २० वर्षे) आज दि २८ रोजी दुपारी चार वाजण्यापुर्वी घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरणगाव येथिल संतोष निगुडे यांनी दिलेल्या खबरीवरून
जामखेड पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल हिंगसे हे करत आहेत. अनिकेत हा नुकताच बारावीची परीक्षा पास झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे आरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










