राज्यस्तरीय महाआवास अभियानात जामखेड पंचायत समितीने पटकावला द्वितीय क्रमांक _आमदार रोहित पवारांच्या नियोजनातुन मागे पडलेले तालुके आता आघाडीवर

0
192
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
        महाआवास अभियानांतर्गत जामखेडच्या पंचायत समितीने राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्हास्तरीय सर्वोतकृष्ट तालुका म्हणुन १०० पैकी ७५.२० गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे.विभागस्तरीय निवड झालेल्या जामखेड पंचायत समितीला दि.३० ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.या अगोदरही ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना या दोन्ही योजनेचे व्दितीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.
      ‘केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती व्हावी’ या उद्देशाने दि.२० नोव्हेंबर २०२० रोजी ‘राष्ट्रीय आवास दिनाचे’ औचित्य साधून राज्यात १०० दिवसांचे ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ आयोजित करण्यात आले होते.या अभियानांतर्गत पंचायत समितीने रमाई आवास योजना,पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सहा महिन्यात ७९१ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
दोन वर्षांपुर्वी जामखेड हे स्पर्धेत उतरले नव्हते. कर्जत जेंव्हा स्पर्धेत उतरले तेंव्हा कर्जतचा ५२ वा क्रमांक आला होता आणि आता कर्जत ५ व्या क्रमांकाच्या स्थानावर आहे.’यावेळेस ताकदीने स्पर्धेत उतरून नागरीकांना यामध्ये सहभागी करून पहिल्या पाच क्रमांकाच्या यादीत आपण आलोच पाहिजे’ असे सूक्ष्म नियोजन आखत आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रभावीपणे राबवली.त्यामुळे गोरगरीब वंचित कुटुंबांना आपल्या हक्काचा निवारा मिळाला आहे.महाआवास अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती मिळावी तसेच जास्तीत जास्त नागरीकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच पंचायत समितीला अभियानाच्या अधीन राहून अधिकचे गुण संपादन करता यावे यासाठी आ.रोहित पवार यांनी संबंधित अधिकारी-पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नियोजन केले होते.घरकुल योजनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. रोहित पवार यांनी मुंबई येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख राजाराम दिघे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे गटविकासाधीकारी अमोल जाधव,जामखेड पंचायत समितीचे गटविकासधिकारी परशुराम कोकणी यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन प्रश्न मांडले.’ड’ यादीत नावे असलेल्या लाभार्त्यांची सर्वेक्षणात चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली नोंदणी,वाहने, टेलिफोन सारख्या सुविधांमुळेही अनेक कुटुंबांना अपात्र करण्यात आले होते.तसेच ज्यांना घरकुलसाठी जागा नाही अशांना यशवंत मुक्त वसाहतमध्ये समूहाने जागा मिळावी,तसेच वाढीव उद्दिष्टाबाबतही आ. रोहित पवार यांनी चर्चा केली होती.
निधीअभावी अनेक घरकुलांचे काम रखडले होते मात्र आ.रोहित पवारांनी पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन दिल्यामुळे घरकुल कामांना गती मिळाली आणि गरीबांना निवारा मिळाला आहे. कोरोनामुळे घरकुल योजनांचा निधी मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र या घरकुल योजना पुर्ण करण्यासाठी आ.रोहित पवार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*आ.रोहित पवारांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच हे शक्य झाले!*
       जेंव्हा कर्जत हे स्पर्धेत उतरले होते तेंव्हा ते ५२ व्या क्रमांकावर होते आणि आता ते ५ व्या स्थानी आहे. जामखेड तर यापुर्वी स्पर्धेत देखील नव्हते.मात्र जेंव्हा ताकदीने स्पर्धेत उतरले तेंव्हा दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले.योग्य नियोजन आणि आ. पवार यांचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले.समृद्ध गाव,माझी वसुंधरा अशा स्पर्धेतही तालुक्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here