जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत तालुक्यातील लोखार येथील मावळे वस्ती वरील दोन मुलांचा शेत तळ्यात पोव्हायला गेले असता दुर्दैवी मृत्यु झाला. हरी नामदेव कोकरे (वय 15) व विरेंद्र रामा हाके (वय 16) हे कोरोना काळातील शाळेला सुट्टी असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिराच्या पुढे चोपडा यांचे शेततळे आहे. त्या मध्ये दुपारी एक, दोन च्या दरम्यान पोव्हायला गेले असता शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न लागल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. पाच ते साडेपाचच्या दरम्यान शेळ्या घरी गेल्या आसता मुले का आली नाहीत यामुळे घरच्यांनी शोध घेतला असता मुलांचे कपडे, चपला,भवानी माता मंदीरा समोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ दिसल्या व त्यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला, त्या नंतर दुसऱ्या मुलाला काढन्यास आंधार पडल्याने आडथळा येत होता परंतु पेडगाव येथील दोण तरुन आसिफ शेख व समीर शेख या दोन मुलांनी पाण्यात बुडी घेऊन रात्री नऊ-साडेनऊ च्या दरम्यान दुसर्या मुलाला ही बाहेर काढले या झालेल्या घटने मूळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






