जामखेड न्युज – – –
महाराष्ट्रात राजकीय घराण्यात पवार घराणे.. बस नाम ही काफी है.. असं अनेक जण म्हणतात. कुणाला अतिशयोक्ती वाटेल पण सामान्य जनतेशी नाळ ठेवत राजकारण, समाजकारण आणि उद्यमशीलता करत बारामतीच्या पवार परिवाराने निश्चित एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रयोगशीलता ही किती गरजेची असते याचे सप्रमाण उदाहरणे पवार कुटुंबाने कृतीतून देत राजकारण आणि समाजकारण केले आहे. गेली पाच-सहा दशके झालेल्या या प्रयत्नातूनच आज बारामतीकर पवार परिवाराला राजकारणात तोड देणं शक्य होत नाही ही वस्तूस्थिती आहे, आणि ती का तर साध्या-साध्या गोष्टीत किती खोलवर जाऊन काम केले पाहिजे हा त्यांचा गुणधर्म..
याचेच ताजे उदाहरण द्यायचे म्हंटले तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतल्या पियाजीयो कंपनीच्या इलेक्ट्रिक ऑटो अर्थात रिक्षाचे परीक्षण स्वतः चालकाच्या सीटवर बसून करत होते. पर्यावरण पूरक वाहने यासाठी केंद्र सरकारचे जेष्ठ मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत. त्याच धर्तीवर राज्यातही महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषणमुक्त महाराष्ट्र त्यासाठी प्रदूषण मुक्त वाहने याच्या वापरावर भर देत आहे. त्यादृष्टीने पियाजीयो कंपनी विविध वाहने बनवत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सर्वाधिक वापर होत असणारी ऑटो रिक्षा ही इलेक्ट्रिक पद्धतीने बाजारात आणत आहे. ही रिक्षा चालकाला वापरताना किती सुसह्य आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी स्वतः ऑटोच्या चालकाच्या सीटवर बसत रिक्षा चालवली.. शेवटी दादांच्या लक्ष्यात आल्यावर त्यांचाही कॉन्फिडन्स वाढला आणि दादांनी कंपनी प्रीमायसेस मध्ये सुसाट रिक्षा चालवून ‘शॉर्ट ड्राइव्ह’चा आनंद घेतला.
एकीकडे काका अजितदादा इलेक्ट्रिक ऑटो ड्राइव्हचा आनंद घेत असताना दुसरी कडे त्यांचेच पुतणे आणि कर्जत-जामखेडचे रोहितदादा अर्थात आमदार रोहित पवार हे टेम्पो ड्राइव्हचा आनंद घेत होते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेतंर्गत महाविकास आघाडी सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना रोजगार मिळवून देण्यासाठी योजना आणली आहे. उद्योग, व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ या योजनेतंर्गत व्यवसाय मिळतो. राज्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना’ सुरू केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी ही योजना लागू आहे. छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. या योजनेमुळे सर्व समावेशक विकास होण्यास मदत होईल. छोट्या उद्योगांतून देखील रोजगार निर्मिती होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग उभारायला मदत होणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात याअंतर्गत वाहतूक व्यवसाय करण्यासाठी कर्जतमध्ये आ. रोहित पवार यांच्या हस्ते रामचंद्र दशरथ कात्रजकर, सतिश छगन उदमले, मनीषा महादेव वराड आणि रोहित भगवान नाळे यांना टेम्पोचं वाटप करण्यात आलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या इतरांनाही टप्प्याटप्प्याने मदत केली जाणार आहे.






