जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड शहरातून भुतवडा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाफना काॅर्नर ते विज महावितरण कार्यालय यादरम्यान असलेल्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करावी तसेच रस्त्यांची झालेली दुरावस्था दुर करावी अन्यथा मनसे स्टाईलने अंदोलन करण्यात येईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
या रस्त्यावरून भुतवडा, लेहनेवाडी, मिलिंदनगर, शाहूनगर, भुतवडा रोडकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठ्याप्रमाणात ये-जा असते. तसेच या रस्त्यावरून
भुसारमाल व ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र या रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहने अनधिकृत रित्या उभी केली जात आहेत. तसेच याभागातील रहिवासी बिनधास्तपणे कचरा व खरकटे पाणी रस्त्यावर फेकून देत आहेत. परिणामी येथून रहदारी करणाऱ्या वाहनचालक व पायी जाणारे नागरिक यांना बेकायदेशीरपणे उभी केलेली वाहने तसेच कचरा व खरकटे पाणी यांची दुर्गंधी यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपरिषद व संबंधित विभागाच्या प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अन्यथा मनसे स्टाईलने अंदोलन केले जाईल असा ईशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, युवक नेते दादासाहेब सरनोबत, तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, शहराध्यक्ष बालाजी भोसले गणेश पवार, भाऊ आमटे आलेश जगदाळे, राहुल जगताप, आकाश साठे, नितीन जाधव, बिभीषण कदम, दादा महाडिक, नितीन सकपाळ नितीन साठे, सोनू कदम आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते होते.






