Wednesday, August 5, 2026
Home क्राईम न्यूज जामखेडमध्ये बनावट मावा निर्मितीवर पोलिसांचा मोठा छापा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध...

जामखेडमध्ये बनावट मावा निर्मितीवर पोलिसांचा मोठा छापा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा सुगंधित तंबाखू, सुपारी, तयार मावा व मावा बनविण्याचे साहित्य जप्त; अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर कारवाई

0
2

जामखेड न्युज – – – – 

जामखेडमध्ये बनावट मावा निर्मितीवर पोलिसांचा मोठा छापा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

सुगंधित तंबाखू, सुपारी, तयार मावा व मावा बनविण्याचे साहित्य जप्त; अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर कारवाई

जामखेड पोलिसांनी बनावट मावा तयार करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274 व 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१२ वाजता जामखेड तालुक्यातील
जांबवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिस काॅन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात विकास सोपान डिसले
(रा. जांबवाडी, ता. जामखेड) आणि नदीम शेख (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींकडून सुगंधित तंबाखू, सुपारी, तयार मावा, मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच मावा बनविण्याचे मशीन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे २० किलो सुगंधित तंबाखू, मोठ्या प्रमाणात सुपारी, ७ किलो तयार मावा आणि मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन यांचा समावेश असून, त्याची एकूण किंमत १,०६,००० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर यांच्या तपास अहवालानुसार, महाराष्ट्रात प्रतिबंधित व आरोग्यास अपायकारक असलेल्या पदार्थांचे मिश्रण करून मावा तयार करून विक्री करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी हा मुद्देमाल विकत घेतल्याची माहितीही पोलिसांसमोर दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव करत असून, संबंधित आरोपींच्या पुरवठा साखळीचाही शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!