लोखंडी राॅड व कोयत्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी, चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
घरासमोर झोपेतून चापट मारून उडवून जुन्या भांडणांचा राग मनात धरून तालुक्यातील नान्नज येथील चौघांनी एका जणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी राॅड व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी चंद्रकांत कल्याण गोरे, वय 50 वर्ष, व्यवसाय शेती, रा. हाळवस्ती नान्नज ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,घरासमोरील पटांगणात बाजेवर रात्री 10.30 वा. चे सुमारास झोपलो. दि. 5 मे रोजी 2026 रोजी रात्री 01/00 ते 01/30 वा.चे सुमारास मला गालात जोरात कोणीतरी चापट मारली मी दचकुन जागा झालो मी बाजेवर उठुन बसताच माझे समोर 1) यशदीप साळवे 2) सतिष साळवे 3)बाबा शेख 4)सद्दाम पठाण असे उभे दिसले त्यात मी त्यांना मला चापट का मारता असे विचारताच यशदीप साळवे याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने माझे कपाळावर उजव्या बाजुस जोराने मारुन मला गंभीर जखमी केले. मी घाबरुन उठायला लागलो तोच सतिष साळवे, बाबा शेख व सद्दाम पठाण यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने माझ्यावर हल्ला करुन आता याला जिंवत सोडू नका म्हणुन गंभीर मारहाण केली. या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चंद्रकांत कल्याण गोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी समक्ष श्रीदीप हॉस्पीटल अहिल्यानगर या ठिकाणी आय.सी.यु.वॉर्ड मध्ये औषध उपचार घेत असताना पुर्ण शुध्दीवर जबाब देतो की, वरील ठिकाणी मी, माझी, पत्नी- मनिषा असे एकत्र राहतो. मला एक मुलगा असून त्याचे नाव- ओम गोरे वय- 22 वर्षे असे आहे. फिर्यादीचा मुलगा ओम याचे ऑगस्ट 2025 मध्ये नान्नज या ठिकाणी साळवे कुटुंबाशी भांडण झाले होते.भांडणामुळे ओम व फिर्यादीचा जावई वैभव साबळे, त्याचा भाऊ- सार्थक साबळे, वडील- विजय साबळे असे सध्या जामखेड कारागृहात आहेत. दि.04/05/2026 रोजी माझी मुलगी सानिका साबळे हिचे पोटाचे आजारामुळे मोरे हॉस्पीटल जामखेड येथे औषध उपचारा साठी दाखल केले होते. त्यामुळे माझी पत्नी मनिषा हि तिच्या सोबत जामखेड येथे गेली होती. ती रात्री उशीराने नान्नजला आली व मुलगी सानिका साबळे हिच्या घरी थांबली. मी घरी एकटाच होतो. मी रात्री जेवण झाल्यानंतर घरासमोरील पटांगणात बाजेवर रात्री 10.30 वा. चे सुमारास झोपलो. दि.= 05/05/2026 रोजी रात्री 01/00 ते 01/30 वा. च्या सुमारास वरील चार आरोपींनी लोखंडी राॅड व कोयत्याने गंभीर जखमी केले.
फिर्यादी घाबरुन गंभीर जखमी आवस्थेत आरडा ओरड करत असताना ते काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसुन निघुन गेले. ते जाताना बोलताना ऐकले की, सुनिल भाऊंनी सांगितलेले काम झाले आता हा 15 ते 20 मिनटात मरुन जाईल. माझ्या ओरडण्याच्या आवाजाणे शेजारील लोक गोळा झाले.
त्यातील कोणीतरी माझ्या पत्नीस संपर्क केला. तेथे अँम्ब्युलन्स आल्यावर मला समर्थ हॉस्पीटल जामखेड येथे अँडमीट केले. तेथे मला बरे वाटत नसल्याने पुढील उपचार कामी श्रीदीप हॉस्पीटल अहिल्यानगर येथे अँडमीट केले आहे. तरी वरील व्यक्तींनी मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केल्यामुळे माझी त्यांचे विरोधात फिर्याद आहे.
वरील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर वर्षा जाधव करत आहेत.