Saturday, August 15, 2026
Home क्राईम न्यूज लहान मुलांच्या भांडणातून पती पत्नी कडून महिलेला मारहाण जामखेड पोलीस स्टेशनला...

लहान मुलांच्या भांडणातून पती पत्नी कडून महिलेला मारहाण जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
101
लहान मुलांच्या भांडणातून पती पत्नी कडून महिलेला मारहाण  जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेड न्युज—–

लहान मुलांच्या भांडणातून पती पत्नी कडून महिलेला मारहाण

जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तुमच्या मुलीने आमच्या मुलाचा बॉल चोरला या कारणावरुन पती-पत्नीने सदर मुलीच्या आईस लाथाबुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण करून जखमी केले आहे.

यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले अशी तक्रार सदर महिलेने पती-पत्नी विरोधात दाखल केल्याने पोलिसांनी भारतीय न्यासहाता 2023 च कलम 118(1), 324(4), 115(2), 352.351(2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संध्या दिपक निमोणकर (वय-३० वर्ष, रा. बेल्हेकरगल्ली जामखेड) यांनी फिर्याद दिली की, बुधवार दि. २२ रोजी सायंकाळी साडेआठ वाजता माझी मुलगी रिध्दी बेलेकर गल्लीतील राहत्या घरासमोर खेळत असताना आरोपी विनोद विटकर व त्याची पत्नी नाव माहीती नाही (दोघे बेल्हेकर गल्ली, जामखेड)

दोघे आले व तुमची मुलगी रिध्दी हीने आमचे मुलाचा बॉल चोरला आहे तो आम्हाला दया असे म्हणुन त्यांनी फिर्यादी व त्यांची आई यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्याने व लाकडी काठीने मारहान करुन जखमी केले.

तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली आहे. सदरचे झटापटीत माझे गळयातील मंगळसूत्र पडुन गहाळ झाले आहे. अशी फिर्याद दिली.

यावरून पोलिसांनी आरोपी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी कदम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!