जामखेड न्युज—–
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरीची वेळ – सुदाम वराट
जामखेडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी

शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर मोलमजुरीची वेळ आली आहे. तिस वर्षे सेवा करून पेन्शन मिळत नाही यामुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी केली.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी गुरूवारी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी काढण्यात आली होती.

यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाडळे, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, मोहन यादव, दत्तात्रय राजमाने, अनिल देडे, उपाध्यक्ष जाकिर शेख, सहसचिव भागवत चांगुणे, कैलास वराट, राघवेंद्र धनलगडे, अमोल भोंडवे, खजिनदार हनुमंत वराट, अर्जुन रासकर, मयूर भोसले, बबन राठोड, रोहित घोडेस्वार, त्रिंबक लोळगे, अतुल दळवी, महसूलचे नंदुरबार गव्हाणे, रविंद्र शेटे, विकास मोराळे, तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष सुजित गोडगे, रमेश कांबळे, दादा शेख, सर्फराज शेख, विलास आजबे, आरोग्य विभागाचे मुबारक शेख, संपत घंटे, लहू जेधे, निलेश खाडे, चंद्रकांत वनवे, सागर गुंड यांच्या सह शिक्षण, महसूल, आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. जामखेड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर, आरोग्य, महसूल यासह अनेक विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे तीन दिवसांपासून शाळा, तहसील कार्यालय, कृषी, आरोग्य विभागाची कार्यालये ठप्प झाले आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धार समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

आज सकाळी दहा वाजता टाळ पखवाज घेऊन करो तहसील आवारात आले. शासनाला जाग आणण्यासाठी ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात एक, दोन, तीन, चार पेन्शन चा जयजयकार, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन जुनी पेन्शन, कर्मचारी एकजुटीचा विजय असो, हम सब एक है अशा घोषणा टाळ मृदंग च्या गजरात मागणी केली. यामुळे संपूर्ण तहसील परिसर भक्ती मय वातावरणात दुमदुमून गेला होता.




