Wednesday, April 15, 2026
Home क्राईम न्यूज चार दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू जामखेड तालुक्यातील घटनेमुळे एकच...

चार दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू जामखेड तालुक्यातील घटनेमुळे एकच खळबळ

0
2

जामखेड न्युज—–

चार दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड तालुक्यातील घटनेमुळे एकच खळबळ

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे १२ एप्रिल रोजी घरासमोर येवुन तुम्ही कोण आम्हाला आडवणारे आम्ही कोठुन पण जावुन तुमच्या शेतात पण येवुन बसु तुम्हाला काय कारायचे ते करा असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन शिवीगाळ दमदाटी करुन लाकडी काठीने फिर्यादी त्यांचा मुलगा व वडील यांना पाठीवर व डोक्यावर मारहाण केली यात फिर्यादी यांचे वडील नगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होते उपचारादरम्यान बुधवार दि. १५ रोजी मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खर्डा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विष्णु मुरलीधर मोहळकर वय 50 वर्ष धंदा शेती रा.पिंपळगाव उंडा ता. जामखेड जि. अ. नगर हे दि. १२ रोजी आरोपी 1.रविंद्र अर्जुन शिंदे 2.कृष्णा रविंद्र शिंदे 3.समर्थ राजेंद्र शिंदे 4. सुवर्णा रविंद्र शिंदे सर्व रा.पिंपळगाव उंडा ता.जामखेड जि.अहिल्यानगर हे घरासमोर येऊन तुम्ही तु कोण आम्हाला आडवणारे आम्ही कोठुन पण जावुन तुमच्या शेतात पण येवुन बसु तुम्हाला काय कारायचे ते करा असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन आरोपी क्र.1 याने लाकडी काठीने फिर्यादी व त्यांचा मुलगा याचे पाठीवर मारहाण केली. फिर्यादी यांचे वडील यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे पाठीवर व डोक्यावर मारहाण केली.

आरोपी क्र.2 याने हातातील लोखंडी गजाने फिर्यादी यांचे कपाळावर व पाठीवर व मुलगा याचे मानेवर डाव्या बाजुला मारहाण केली. फिर्यादी यांचे वडीलास जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गजाने त्यांचे डोक्यात व छातीत मारहाण करुन जखमी केले. आरोपी क्र.3 याने फिर्यादी यांचे मुलगा लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी क्र.4 याने शिवीगाळ दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून खर्डा पोलीस स्टेशनला गु.रजि.नं व कलम 51/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103, 109(1), 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हा दाखल असताना फिर्यादी यांचे वडील नामे मुरलीधर दग़डु मोहळकर वय 70 वर्षे हे दिनांक 12/04/2026 रोजी पासुन गंभिर जखमी असल्याने त्यांना अंत्य आवस्थेत असताना उपचारार्थ मॅककेअर हॉस्पीटल, अहिल्यानगर येथे दाखल असताना उपचारा दरम्यान दिनांक 15/04/2026रोजी 15/15 वा. मयत झाले असल्याने त्या प्रमाणे डेथ मेमो प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्याच्या कलमात भा.न्या.सं. कलम 103 प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे.

सदर चा गुन्हा दाखल होताच सपोनि उज्वलसिंह राजपूत यांनी तत्काळ दोन स्वतंत्र टीम तयार करून आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केल्या गुन्हा घडल्या नंतर आरोपी क्र 1 यास 24 तासाच्या आत मध्ये अटक केली होती.


सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे. अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रवीणचंद्र लोखंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उज्वलासिह राजपूत, सफौ रईस सय्यद,पोहेकॉ, संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले,पोलीस अंमलदार, शशी म्हस्के, राहुल शिंदे, गणेश बडे, यांनी सदर ची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!