Wednesday, March 4, 2026
Home क्राईम न्यूज जामखेड पुन्हा हादरले, गोळीबारात कुख्यात गुंड सागर मोहळकर गंभीर जखमी सात...

जामखेड पुन्हा हादरले, गोळीबारात कुख्यात गुंड सागर मोहळकर गंभीर जखमी सात राउंड फायर चार गोळ्या अंगात

0
2

जामखेड न्युज—–

जामखेड पुन्हा हादरले, गोळीबारात कुख्यात गुंड सागर मोहळकर गंभीर जखमी, सात राउंड फायर चार गोळ्या अंगात

जामखेड शहरातील न्युरानी काँलनी येथे सात साडेसात वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड सागर मोहळकर वर मोटारसायकल आलेल्या एकाने गोळीबार करत सात राऊंड फायर करण्यात आले यातील चार गोळ्या अंगात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यात मोहळकर गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड शहरातील न्युरानी काँलनी येथे आज बुधवार दि. ४ रोजी सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली असून कुख्यात गुंड सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता अनेक गुन्हे असलेला सागर मोहळकर असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. तो नशेच्या आहारी आसायचा जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती.

गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलीसांनी ताबडतोब त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले नंतर शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी नगरला हलवले. त्याच्या अंगात चार गोळ्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले यामुळे एकुण सात राउंड फायर झाले असावेत.

कुख्यात गुंड सागर मोहळकर असलेल्या 307 गुन्ह्याबद्दल कारवाई म्हणून नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामखेड पोलीसांनी पाठवले होते. तो नुकताच जामीनवर बाहेर आला होता. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दवाखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!