खर्डा हादरले, सासरच्या छळाला त्रासलेल्या नववधूने गळफास घेत आत्महत्या
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सासरच्या सततच्या छळाला त्रासलेली नववधू ऐश्वर्या लखन शिंदे (वय ?) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा भाव सुरज बाळू इंगळे वय (२४) व्यवसाय शिक्षण, झिंगे बोंबली विक्री, रा. शिव शंकरनगर, भूम यांनी 1)पती लखन चंद्रकांत शिंदे, 2)सासू उषा चंद्रकांत शिंदे,3) दिर राहूल चंद्रकांत शिंदे 4)नणंद रोहिणी त्र्यंबके यांच्यावर खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील 1)पती लखन चंद्रकांत शिंदे 2)सासू उषा चंद्रकांत शिंदे 3)दिर राहुल चंद्रकांत शिंदे यांना अटक केली आहे.
फिर्यादीनुसार, ऐश्वर्याचे लग्न झाल्यापासून आरोपींकडून तिला वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ होत होता. हुंडा न दिल्याबद्दल, सोन्याचे दागिने न घेऊन दिल्याबद्दल, घरकाम नीट न येत असल्याबद्दल सतत शिवीगाळ करत. “तुझी बहीण घेऊन जा, मी तिला नांदवणार नाही. तिला दोन मुली झाल्या आहेत,” असे म्हणून तिला भिकारीची मुलगी म्हणून तुच्छतेचे बोलत असत. याशिवाय चारचाकी गाडीसाठी १० लाख रुपये मागितले.
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शुक्रवार पेठ, खर्डा येथे हा प्रकार घडला. पहाटे ४ वाजता पती लखनने दारूच्या नशेत घरी येऊन ऐश्वर्याला कशाने तरी पायावर, मांडीवर, हाताच्या दंडावर, पाठीवर, कमरेवर, कपाळावर व ओठावर मारहाण केली. या मारहाणीला त्रासलेली असताना तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात कलम १०८, ११५(२), ११८(१), ११८(२), ८६, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा क्रमांक २६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि उज्वससिंग राजपुत करीत आहेत. 3 आरोपीला अटक करण्यात आली आहे.