Saturday, April 11, 2026
Home क्राईम न्यूज जामखेड तालुक्यातील रत्नापुर शिवारातून ६० हजारांची पाणबुडी पंप चोरीला गेला!

जामखेड तालुक्यातील रत्नापुर शिवारातून ६० हजारांची पाणबुडी पंप चोरीला गेला!

0
69

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील रत्नापुर शिवारातून ६० हजारांची पाणबुडी पंप चोरीला गेला!

 

रत्नापूर शिवारातून ६० हजारांचा पाणबुडी पंप चोरीला गेला जामखेड तालुक्यातील रत्नापूर गावच्या शिवारातील शेत गट क्र. ५२० मधून अज्ञात चोरट्याने ७.५ एचपी विद्युत पाणबुडी पंप चोरून नेल्याची घटना घडली.

विद्युत पाणबुडी पंप चोरीला गेल्याने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोटार चोराचा पोलीसांनी तपास लावून चोराला योग्य धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.

फिर्यादी किशोर महादेव बोराटे (वय ४७, रा. खर्डा रोड कॉर्नर, जामखेड) यांच्या शेतातील हा पंप दि.१७ फेब्रुवारी २०२६ रात्री ८ वाजल्यापासून १८ फेब्रुवारी सकाळी ९ पर्यंत चोरीला गेल्याची घटना जामखेड हद्दीत घडली आहे.

एकूण किंमत ६०,७६० रुपये असलेल्या या मालाची चोरी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी किशोर बोराटे यांनी फिर्याद दिली.

गुन्हा क्र. ९१/२०२६ अंतर्गत बीएनएस २०२३ कलम ३०५(बी) प्रमाणे नोंद घेण्यात आली असून पो.ना. जितेंद्र सरोदे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!