रक्षा विसर्जन पाण्यात न करता वृक्षारोपण करूनकोल्हे परिवाराने निर्माण केला आदर्श
रक्षा (अस्थी) पाण्यात विसर्जित न करता त्या ठिकाणी वृक्षारोपण करणे हा एक पर्यावरणपूरक आणि स्मृती जपणारा उपक्रम आहे. यामुळे जलप्रदूषण टाळून निसर्गाचे संवर्धन होते. म्हणून कोल्हे परिवाराने रक्षा विसर्जन पाण्यात न करता वृक्षारोपण करून कोल्हे परिवाराने आदर्श निर्माण केला आहे.
ज्ञानदेव बप्पाजी कोल्हे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कोल्हेवाडी ग्रामस्थांनी अस्थी विसर्जनाऐवजी शेतात खड्डा करून त्यात राख टाकून नारळाचे झाड लावून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पाण्यात अस्ती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कोल्हे परिवाराने रक्षा विसर्जन पाण्यात न करता शेतात खड्डा घेऊन नारळाचे झाड लावले व एक समाजात चांगला आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी सुभाष ज्ञानदेव कोल्हे, चंद्रभान ज्ञानदेव कोल्हे मुले, झुंबर मुटके, शांताबाई निगुडे मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार उपस्थित होता.
यावेळी अंगद कोल्हे, मेजर सर्जेराव कोल्हे, शिवाजी कोल्हे, आण्णा कोल्हे, अतुल कोल्हे, बजरंग कोल्हे, प्रकाश कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, वैभव कोल्हे, दादा मुटके, बाळु निगुडे यांच्या सह अनेक ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.