जामखेडमध्ये नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा, आमदार सुरेश धस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव
इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी, पुणे आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा शनिवार, २ ऑगस्ट रोजी जामखेड येथे उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत तब्बल सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा गौरव आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजवर्धन बडे, श्रावणी राख आणि श्रावणी गोंदकर यांना महाविजेते म्हणून गौरविण्यात आले. तर अनेकांना फर्ट रॅक, सेकंड रॅक, थर्ड रॅक असे पारितोषिक देण्यात आले तसेच बेस्ट टिचर्स अवार्ड अश्विनी सागर कोल्हे यांना मिळाला यावेळी बिबट्या च्या हल्ल्यातून सुखरूप सुटका करून घेणारा सार्थक जरेचा विशेष सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. श्री. संजय कोठारी (सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, जैन कॉन्फेडरेशन, दिल्ली), अमित देशमुख (उपविभागीय डाक अधिकारी, कराड), प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, यावेळी मा. श्री. संजय कोठारी (सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, जैन कॉन्फेडरेशन, दिल्ली), श्री. विकास राळेभात (माजी नगराध्यक्ष), मा. श्री. अमित देशमुख (उपविभागीय डाक अधिकारी, कराड), मा. सौ. शितल पाचारणे (कृषी अधिकारी), मा. डॉ. गौतम केळकर (प्राचार्य, जामखेड महाविद्यालय), मा. श्री. नितीन कर्डुले (केंद्रप्रमुख, आष्टी), मा. श्री. सुदाम वराट (पर्यवेक्षक), मा. श्री. बबन मोरे (लेखा परीक्षक), श्री. गणेशशेठ डोंगरे (नगरसेवक), मा. श्री. सागर (भाऊ) कोल्हे (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्ष, जामखेड), मा. सौ. मनिषा काळदाते (संस्थापिका, दि सेंच्युरी स्कूल), मा. श्री. केतनशेठ भंडारी (युवा उद्योजक), मा. श्री. अशोक चोरडिया, मा. श्री. गोपाळभाऊ रक्टाटे (माजी उपसभापती, पंचायत समिती, आष्टी), तसेच कु. अर्चना शेळके (अध्यक्षा) आणि श्री. दादासाहेब शेळके (सचिव, इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी, पुणे) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. मधुकर राळेभात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “अबॅकसच्या पाच मिनिटांच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अचूकता, वेग आणि गुणवत्तेची वाढ होते. हीच मुले जीवनात पुढे जाऊन यशस्वी होतात.” त्यांनी अबॅकस शिक्षणामुळे मानसिक गणिताची क्षमता वाढते आणि आत्मविश्वास दृढ होतो, असेही नमूद केले.
आमदार सुरेश (आण्णा) धस यांनी आपल्या भाषणात लहान वयातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “गणितीय पद्धतीने शिक्षण घेतल्याने मुलांची एकाग्रता वाढते, अचूकता विकसित होते आणि डावा-उजवा मेंदू समतोलपणे कार्य करू लागतो. त्यामुळे किचकट विषयही सोपे वाटू लागतात.” पुढे बोलताना त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देत सांगितले, “संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवली. मुलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.” छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना त्यांनी “जगातील एकमेव राजा ज्यांचा जयघोष केला की अंगावर शहारे येतात,” असे उद्गार काढत उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.पालकांनाही उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही जागरूक पालक आहात. मुलांवर लक्ष ठेवून त्यांना योग्य दिशा देणे ही मोठी जबाबदारी आहे.”
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सांगितले की, “गणित सोपे जाण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त आहे. ज्यांना यंदा पारितोषिक मिळाले नाही, त्यांनी निराश होऊ नये. ‘इस बार नही तो अगली बार सही’ हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवावा.”
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले, “प्रयत्न करत राहा. यश मिळाले म्हणून प्रयत्न थांबवू नका आणि अपयश आले म्हणून खचून जाऊ नका.”
कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची मोठी उपस्थिती आणि मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे जामखेडमधील हा नॅशनल लेव्हल अबॅकस सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम शेळके, दादासाहेब शेळके, अर्चना शेळके यांनी केले.