Home ताज्या बातम्या जिल्हा बँकेत सहकारी संस्थेच्या प्रतिनिधींकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

जिल्हा बँकेत सहकारी संस्थेच्या प्रतिनिधींकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
6

जामखेड न्युज——-

जिल्हा बँकेत सहकारी संस्थेच्या प्रतिनिधींकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण राज्यावरच नव्हे तर देशावर शोककळा पसरली असून यानिमित्त जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात व सहकार परिवाराच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते जगन्नाथ तात्या राळेभात पाटील सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

स्व.अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली.
यावेळी सुरेश भाऊ भोसले, निकम काका, साहेबराव कडभने, नरेंद्र जाधव, शरद शिंदे, विलास जगदाळे, महादेव डूचे सर, मकरंद काशीद, डॉ अविनाश पवार, विजयसिंह गोलेकर, सुधीर दादा राळेभात व अमोल दादा राळेभात यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करून अजित दादांना श्रद्धाजंली वाहिली.

यावेळी श्रद्धाजंली वाहताना जिल्हा बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या कामकाजावर दादांचे विशेष लक्ष होते.अजित दादा हे शरद पवार साहेबांच्या तालमीत वाढलेले नेते होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय सर्व स्तरातील उन्नतीचे काम दादांनी केले. शेतकरी, मजूर, व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय दादांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. आ.रोहित दादा पवार हे पवार घराण्यातील असल्याकारणाने कर्जत जामखेडवर अजित दादांचे विशेष प्रेम होते.

दादांची सहकारावर मजबूत पकड होती, त्यामुळेच सहकाराचे भवितव्य दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित व विकासात्मक राहिले.सहकाराच्या माध्यमातून दादांनी अनेक लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, अशी भावना अमोल दादा राळेभात यांनी व्यक्त केली.

यावेळी अंकुश कोल्हे, महादेव डिसले, राजेंद्र गोलेकर, अमृत पाटील, मिठू खोसे, दादाहारी थोरात, ब्रह्मदेव शिंदे, लक्ष्मण कोल्हे, बलभीम परकड, शहाजी मिसाळ, राजू बारवकर, किसन बापू ढवळे, बबन ढवळे, बाबासाहेब इथापे, जयवंत सावंत, तात्याबा भोरे, तुराब शेख, कल्लू चाचा, संजय उगले, मधुकर खरात, नंदू गोलेकर, मदन गोलेकर, भारत काकडे, दादासाहेब पवार, पाराजी ढवळे, काकासाहेब सुरवसे, दत्तात्रय बारवकर, अभिमन्यू खोसे, बालाभाई शेख, हरिभाऊ बैरागी, अशोक लेंढे, किसन बोराटे, गुलाब कोल्हे, दादासाहेब वामन पवार, सोमनाथ श्रीरामे, कोठावळे साहेब, कॉन्ट्रॅक्टर फुटाणे साहेब भास्कर फुंदे, हरिभाऊ आजबे, कांतीलाल वाळुंजकर, नरसाळे डॉक्टर, गजानन शिंदे, संतोष दरगुडे, हरिदास काळदाते, नितीन सपकाळ, चत्रभुज तांदळे, दिपक नेटके, दादा चव्हाण, कांतीलाल जगदाळे, भगवान भोरे, संजय देशमुख, नागेश काळभोर, नंदकुमार बहिर, राजेंद्र गावडे, अनिरुद्ध धेंडे, आबासाहेब कोंडाणे, अप्पासाहेब डोके, भाऊसाहेब अडाले, विठ्ठल अडाले, राजू धाउड, भाऊसाहेब तनपुरे, अशोक घुमरे, संतोष गंभिरे, दादासाहेब मेंढकर, प्रताप वीर, राजू चौधरी, मनेश भोसले, सुरेश लेकुरवाळे, प्रकाश चऱ्हाटे यांनी उपस्थित राहून दादांना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!