Tuesday, August 4, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात धाडसी चोरीचा प्रयत्न; धानोरा शिवारात मध्यरात्री खळबळ

जामखेड तालुक्यात धाडसी चोरीचा प्रयत्न; धानोरा शिवारात मध्यरात्री खळबळ

0
3

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड तालुक्यात धाडसी चोरीचा प्रयत्न; धानोरा शिवारात मध्यरात्री खळबळ

तालुक्यातील धानोरा शिवारात घराच्या पडवीत झोपलेल्या कुटुंबाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत मोबाईलसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. महिलेच्या गळ्यातील दागिने काढताना तिला जाग आल्याने तिने आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडूरंग दादा लबडे (वय ६५, रा. पिपरखेड, ता. जामखेड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लबडे यांचे कुटुंब धानोरा शिवारातील वास्तव्यास आहे. २९ जुलै रोजी रात्री ते पत्नी, दोन्ही सुना आणि नातवंडांसह घराच्या पडवीत झोपले होते. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उशाजवळ ठेवलेला विवो कंपनीचा मोबाईल चोरला. त्यानंतर पत्नीच्या नाकातील सोन्याची नथ काढून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला.

दागिने काढताना पत्नीला जाग आल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे घरातील सर्व सदस्य जागे झाले. त्यावेळी दोन अज्ञात इसम पळून जाताना दिसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर घराची पाहणी केली असता घरातील एका खोलीचे दार उघडे असून संपूर्ण घराची उचकापाचक करण्यात आल्याचे दिसून आले. घरात ठेवलेल्या भरणीतून मोठे सोन्याचे मनी मंगळसूत्र व जोडवी चोरीस गेल्याचे उघड झाले. चोरीस गेलेल्या ऐवजात ५ ग्रॅमचे मनी मंगळसूत्र, ३ ग्रॅमची सोन्याची नथ, १० ग्रॅमचे मोठे मनी मंगळसूत्र आणि विवो कंपनीचा मोबाईल असा सुमारे ५७ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!