नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निष्ठावंतांना संधी देणार की नवीन चेहरा देणार ? जामखेड करांच्या पसंतीस उतरलेल्या बाफना यांचा कोणता पक्ष विचार करणार

0
944

जामखेड न्युज—–

नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निष्ठावंतांना संधी देणार की नवीन चेहरा देणार ?

जामखेड करांच्या पसंतीस उतरलेल्या बाफना यांचा कोणता पक्ष विचार करणार

 

जामखेड नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी लढत होईल की स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढले जातील हे अद्याप स्पष्ट नसले तरी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी साठी लाँबिंग सुरू झाले आहे. जामखेड मध्ये तरी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सभापती प्रा राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशा लढतीची शक्यता आहे. घटक पक्ष काय भुमिका घेतात तसेच तिसरी आघाडी काय करणार हे लवकरच दिसून येईल. सध्या तरी कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. निष्ठावंतांना संधी देणार की नवीन चेहरा देणार नवीन चेहरा असेल तर ते कोण अशीच चर्चा सुरू आहे. तसेच जामखेड करांच्या पसंतीस उतरलेल्या बाफना यांचा कोणता पक्ष विचार करणार अशीच चर्चा सुरू आहे.

सामाजिक कामात अग्रेसर असणारे आकाश बाफना कोणती भुमिका घेणार याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी आकाश बाफना हे आपल्या आदर्श फाऊंडेशन च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामांमुळे लोकांच्या पसंतीस उतरलेले नाव आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आदर्श फाऊंडेशन च्या माध्यमातून मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे कामाचा माणूस म्हणून आज जामखेड कर त्यांच्या कडे पाहत आहेत.

सध्या तरी जामखेड मध्ये चर्चेत आदर्श फाऊंडेशन चे आकाश बाफना यांनी शहरासह वाडी वस्तीवर हजारो ब्रास मुरमीकरण केले आहे. तसेच अनेक ठिकाणी लाईट ची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक शाळांमध्ये चिखलांचे साम्राज्य होते तेथे मुरमीकरण केले. पुलांची दुरूस्ती केली. रस्ते चांगले केले तसेच नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन याच बरोबर तीस वर्षांपासून जामखेड ते पंढरपूर संपूर्ण दिंडी नियोजन करतात. 

आदर्श फाऊंडेशन ने शहरासह वाडी वस्तीवर कोट्यवधी रुपयांची पदरमोड करून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे जनतेच्या मनात नगराध्यक्ष पदासाठी पायलताई बाफना यांना पसंती मिळत आहे. ते जामखेड करांच्या पसंतीस उतरलेले नाव आहे. त्यांचा विचार कोणता पक्ष करणार अशीच चर्चा परिसरात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सध्या चर्चेत असलेली नावे म्हणजे अर्चनाताई संपत राळेभात, संध्या शहाजी राळेभात, कोमल बिभीषण धनवडे, राजेंद्र कोठारी यांच्या सौभाग्यवती ही नावे चर्चेत आहेत. आता आमदार रोहित पवार हे यापैकी एकाला तिकीट देणार की जनतेच्या पसंतीस उतरलेल्या पायलताई आकाश बाफना यांना उमेदवारी देणार अशीच चर्चा सुरू आहे.

जामखेड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार निष्ठावंत यांना संधी देणार की, आकाश बाफना यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन थेट उमेदवारी देणार असा प्रश जनता विचारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here