भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच प्रमुख दावेदार सुनीताताई मधुकर राळेभात, रोहिणीताई संजय काशिद, प्रांजल अमित चिंतामणी

0
962

जामखेड न्युज——

भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

प्रमुख दावेदार सुनीताताई मधुकर राळेभात, रोहिणीताई संजय काशिद, प्रांजल अमित चिंतामणी

जामखेड नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी लढत होईल की स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढले जातील हे अद्याप स्पष्ट नसले तरी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी साठी लाँबिंग सुरू झाले आहे. जामखेड मध्ये तरी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा लढतीची शक्यता आहे. घटक पक्ष काय भुमिका घेतात तसेच तिसरी आघाडी काय करणार हे लवकरच दिसून येईल.

सध्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आढावा घेतला आहे. लवकरच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होईल. पण सध्या तरी शहरात भाजपाकडून तीन नावे चर्चेत आहेत. ते म्हणजे सुनीताताई मधुकर राळेभात, रोहिणीताई संजय काशिद व प्रांजलताई अमित चिंतामणी

सुनीताताई मधुकर राळेभात

कणखर व सामाजिक सलोखा राखणारे नेतृत्व हवे

नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करण्या पाठीमागे असलेली भूमिका मांडताना प्रा. राळेभात म्हणाले, जामखेड शहराचं स्वरूप बदलतय, जामखेड शहर गुंडाचे घर वाटायला लागले आहे. ही प्रतिमा बदलायला हवी; त्याकरिता सर्वांनी मिळून काम करायचे आहे. मात्र या करिता आपल्याकडे प्रमुख जबाबदारी असावी; सामाजिक सलोखा रहावा, हाताला काम देणार जामखेड शहर व्हावं, व्यापारी मंडळी कडून स्थलांतरा संदर्भात सुरू असलेला विचार थांबवावा, व्यावसायिक मॉलची उभारणी व्हावी, बचत गटासाठी स्वतंत्र मॉलची उभारणी केली जावी; त्याकरिता सुनिताताई मधुकर राळेभात नगराध्यक्ष पदासाठी ‘इच्छूक’आहेत. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत; जरज्ञपक्षाने उमेदवारी दिली नाही तर ज्या व्यक्तीला पक्ष उमेदवारी देईल; त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, ” अशी ग्वाही प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.

 

रोहिणीताई संजय काशिद

विकासाबरोबरच सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक उपक्रम राबविणाऱ्या रोहिणीताई संजय काशिद नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार

 

महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई काशिद या महिला व मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांचे विविध शिबिरे, तलवार बाजी, लाठीकाठी, हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला), रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे, असे विविध सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक उपक्रम वर्षभर राबविणारे नेतृत्व हवे भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद तसेच त्यांच्या पत्नी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे दाम्पत्य वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करतात. गडकिल्ले स्वच्छता मोहीम, गौरी सजावट स्पर्धा, वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर बनवणे, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, जिल्ह्यात एकमेव महिला आयोजन शिवजन्मोत्सव साजरा करतात. यासह अनेक विकासाबरोबरच
सामाजिक व धार्मिक कामाच्या बळावर नगराध्यक्ष म्हणून काम करणाऱ्यास संधी मिळावी

प्रांजल अमित चिंतामणी

विकास कामाच्या बळावर उमेदवारी मिळावी

 

भाजपचे माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजल चिंतामणी या भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. कारण अमित चिंतामणी यांनी नगरसेवक असताना सर्वात जास्त विकास कामे मार्गी लावली.
भुमिगत गटाराची संकल्पना जामखेड शहरात प्रथम अमित चिंतामणी यांनी आणली. पेव्हिंग ब्लॉक सह सिंमेट रस्ते अशी कितीतरी दर्जेदार कामे केली. प्रांजल ताईच्या माध्यमातून महिलांचे संघटन, नवरात्र उत्सवात मोहटादेवी दर्शन, ओपन दांडिया कार्यक्रम शहराच्या विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व करणारा सर्व समावेश चेहरा असावा, विकास कामांबरोबरच लोकांच्या सुख दुःखात येणाऱ्यास जामखेडचे नगराध्यक्षपद मिळावे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here