शेतकऱ्यांच्या हितासाठी वडिलांप्रमाणेचमीही काम करणार – पै. चिराग मंगेश आजबे
साकत गटातील खुरदैठण येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापाऱ्यांची नाराजी ओढून घेतली व पसा पद्धत बंद केली. शेतकरी हितासाठी नेहमीच संघर्ष करत न्याय मिळवला. मंगेश आजबे हेच खरे शेतकऱ्यांचे कैवारी आहेततेच काम मीही पुढे चालू ठेवणार असे मतसाकत जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार पै.चिराग आजबे यांची गाव भेट व घोंगडी बैठकीत खुरदैठण येथे सांगितले या बैठकीला शेतकरी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज खुरदैठन गावात ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि गावाच्या विकासाची दिशा जाणून घेतली. जनतेच्या डोळ्यातील विश्वासच आमची खरी ताकद आहे.गावाचा विकास, तरुणांच्या संधी आणि शेतकऱ्यांचं भविष्य या सगळ्याचं उत्तर आपल्याच एकतेत दडलेलं आहे. “खुरदैठन विकास हा केवळ वचन नाही, तो आपला संकल्प आहे!” असे सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी मंगेश दादा यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली आंदोलन आणी त्या माध्यमातुन कसा न्याय मिळाला याबाबत चर्चा झाली तसेच सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी दादा नेहमी कशी मदत करतात त्यामुळे अशा कार्यक्षम नेतृत्वाला आपण संधी दिली तर आपल्या आडचणी सोडवण्यासाठी त्यांना आणखी बळ मिळाले आशा भावना ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केल्या.
आणी हाच संदर्भ देत पै. चिराग आजबे म्हणाले की आज मी निवडणूकीच्या निमीत्ताने आमदार रोहित पवार व वडील मंगेश आजबे यांचे विचार सोबत घेऊन गावागावात जातो आहे आणी याच दरम्यान त्यांनी केलेले कार्य वडीलधारी मंडळी सांगतात यामुळे त्यांचा सर्व सामान्यांशी आसलेला संपर्क आणी माझ्या वडीलांबद्दल आसलेला आपलेपणा याचा मला सार्थ अभिमान आहे त्यांच्याच कार्यपद्धती मीही भविष्यात आपली सेवा करीत राहील असे बोलताना पै.चिराग आजबे यांनी सांगितले.
समारोपाच्या भाषणात बोलताना मंगेशदादा आजबे म्हणाले की शेतकरी हा आपला धर्म कोण कोणत्या पक्षाचा गटाचा आसा भेदभाव मी कधी केला नाही आणि तुमच्या पाठिंब्याच्या आधारावरच मी आनेक आंदोलने केली आणी ती यशस्वी करून दाखवली यातुनच आज तुम्ही माझं जे स्वागत केलं आणि प्रतिसाद दिला त्याने माझा ऊर भरून आला आसचं प्रेम व आशिर्वाद राहु ही आपेक्षा व्यक करतो आशी भावना व्यक्त केली.
गावकऱ्यांनी वाजत गाजत मंगेशदादा आजबे व पै. चिराग आजबे यांचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने खांडवी ग्रामस्थ उपस्थित होते