जामखेड न्युज—–
जामखेडच्या मल्लाचा एशियन यूथ मधे डंका
पै. सुजय नागनाथ तनुपुरे ला बेहरीन येथे झालेल्या एशियन यूथ मधे रौप्य पदक
बेहरीन येथे झालेल्या एशियन यूथ मधे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल व भैरवनाथ तालीम संघ शिऊर चा मल्ल पै. सुजय नागनाथ तनुपुरे याने रौप्य पदक मिळवले आहे. याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पै सुजय तनपुरे यांने अमन जॉर्डन आशियाई स्पर्धा गोल्ड मेडल व्हिएतनाम देशात आशिया स्पर्धेत गोल्ड मेडल आणि आता बेहरिग देशात देशामध्ये सिल्वर मेडल मिळवले आहे.

जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पै. सुजय तनपुरे यांने 2023 मध्ये आशियाई कुस्ती 68 kg वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. खेलो इंडिया गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. वडील नागनाथ तनपुरे, हे देखील कुस्तीमध्ये सक्रिय आहेत. सुजयने आशियाई कुस्ती स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

सुजय तनपुरे याने 2018-19 मध्ये तो सरावासाठी पुण्यात गेला, कारण त्याच्या गावी पुरेसे भागीदार नव्हते. 15 मे 2025 रोजी पाटणा येथे झालेल्या खेलो इंडिया गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. सुजयने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

सुजय तनपुरे याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. यामुळे जिल्हा आँलंपिक असोसिएशन कडून जुलै 2024 मध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळाला होता. तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली होती.

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. आताही याही वर्षी सुवर्णपदक पटकावले होते. आता बेहरीन येथे झालेल्या एशियन यूथ मधे रौप्य पदक जिंकले आहे.
चौकट
बेहरीन येथे झालेल्या एशियन युथ गेममध्ये माझ्या मतदारसंघातील शिऊर येथील मल्ल सुजय नागनाथ तनपुरे याने रौप्यपदक पटकावल्या बद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन! त्याने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.भविष्यातही त्याने अशीच यशाची शिखरं काबिज करावीत ही सदिच्छा आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा!
आमदार रोहित पवार





