शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या प्रश्नांसाठी “महाएल्गार” मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे – जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले

0
163

जामखेड न्युज——

शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या प्रश्नांसाठी “महाएल्गार” मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे – जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, सर्व कामगार वर्ग व दिव्यांग बंधू-भगिनीच्या न्यायहक्क व कर्जमुक्तीसाठी दि. २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार्‍या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांनी केले आहे.

‘७/१२ कोरा करा. तो शेतकऱ्यांचा हक्क आहे..’ असे बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. २८ ऑक्टोबरला नागपूरची भूमी उत्तर मागेल. आता मौन नाही. उत्तर हवे. चला नागपूर, शेतकर्‍यांचा एल्गार उठणार! असा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चूकडू यांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, सर्व कामगार वर्ग व दिव्यांग बंधू-भगिनींनो यांचेसाठी राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्राणपणाने संघर्ष करून त्यांना न्याय देण्याचे काम करत असतात.

त्याच अनुषंगाने दि.२८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे निघत असलेल्या महाएल्यार मोर्चात जामखेड तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, कामगार वर्ग व दिव्यांगांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांनी केले आहे.

२८ ऑक्टोबर रोजी नागपूर मधून नव्याने आंदोलन सुरू होणार असल्याचे समोर येत आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी प्रहार सरकारची डोकेदुखी वाढवणार असल्याचे समोर येत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यानी पुन्हा एकदा ठेवणीतील शस्त्र बाहेर काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here