भाजप युवामोर्चा तालुका अध्यक्षपदी प्रशांत शिंदे शितलताई शिंदे जवळा जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ दावेदार

0
278

जामखेड न्युज——-

भाजप युवामोर्चा तालुका अध्यक्षपदी प्रशांत शिंदे

शितलताई शिंदे जवळा जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ दावेदार

 शांत, संयमी, अभ्यासू, उच्चशिक्षित, कायम जनतेत रमणारा, जनसेवेसाठी अहोरात्र झटणारा, कायम विकासाभिमुख राजकारण करणारा, लहानांपासून थोरांपर्यंत- सर्व समाज घटकांना आपलासा वाटणारा, उत्तम संघटन कौशल्य असलेला, गोरगरीब – सामान्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा आणि कठिण प्रसंगी राजकीय चमत्कार घडवण्याची ताकद असलेला, स्वच्छ प्रतिमा आणि प्रभावशाली तरूण नेतृत्व अशी ओळख असलेल्या प्रशांत(भाऊ) शिंदे या युवा नेत्याला ऐन दिपावलीच्या तोंडावर विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे. भाजपने त्यांच्या खांद्यावर मोठी धुरा सोपवली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ही निवड राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात असून जवळा गणात प्रशांत शिंदे यांचा मोठा चाहता वर्ग आहे.जवळा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव आहे. त्यांच्या पत्नी शितलताई शिंदे ह्या जवळा गावच्या उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकी साठी त्यांची उमेदवारी जवळा गटातून चर्चेत आहे. भाजपकडून त्या प्रबळ दावेदार आहेत. सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे.

जिल्हा परिषद निवडणूकीच्या हालचाली गतिमान झालेल्या असताना प्रशांत शिंदे यांना पक्षाने राजकीय बळ देत थेट युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने प्रशांत शिंदेंचे केलेले दमदार लाँचिंग तरुण वर्गात उत्साह आणि नवा जोश भरणारे ठरले आहे.

प्रशांत शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक असून, गेल्या अनेक वर्षापासून ते पक्षात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांनी २०१४ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली. पक्ष संघटन मजबूत करण्या बरोबरच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे.

जवळा जिल्हा परिषद गटात शितल प्रशांत शिंदे यांची उमेदवारी चर्चेत असताना, प्रशांत शिंदे यांच्याकडे तालूक्याच्या युवा नेतृत्वाची धुरा देणे म्हणजे पक्षाने शिंदे कुटुंबियांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यांचा स्पष्ट संकेत आहे. प्रशांत शिंदे यांच्या सौभाग्यवती शितल प्रशांत शिंदे सध्या जवळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून कार्यरत असून, गेल्या दहा वर्षापासून जवळा ग्रामपंचायतीवर शिंदे कुटुबिंयांचे वर्चस्व असून, ग्रामपंचायत निवडणुकी पासून ते विविध कार्यकारी सोसायट्या पर्यंत स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक राजकारणात आपली मजबूत पकड सिद्ध केलेली आहे.

एकूणच गावचा कारभार प्रशांत शिंदे या तरुण युवा नेत्याच्या भोवती केंद्रित आहे. या निवडीमुळे तालुक्यातील कार्यकत्यामध्ये ही प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने योग्य व्यक्तीला संधी दिली असून, प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा अधिक प्रभावीपणे काम करेल, असे मत अनेक कार्यकत्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here