साकत घाटात पुन्हा बिबट्याचा वावर, परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी
गेल्या वर्षी साकत, सौताडा, भुतवडा, मोहा, मोहरी धामणगाव परिसरात बिबट्याचा वावर होता. अनेक ठिकाणी शेळ्या, वासरे याचा पडशा पाडला होता. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरा लावलेला होता. बरेच दिवस तो गायब होता.
आज शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास वराट सर जामखेड वरून साकतला आपल्या चारचाकी गाडीने जात असताना घाटाच्या वर आल्यावर श्री साकेश्वर गोशाळेजवळ असतात अचानक गाडीला आडवा आला व मोहा कडील डोंगराकडे गेला.
चारचाकी गाडीत असतानाही अचानक गाडीच्या समोर बिबट्या दिसल्याने तेही घाबरले बिबट्या मोहा दिशेने गेला. तरी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. आपापले गुरे, शेळ्या यांची चांगली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जुलै महिन्यात मोहरी येथे बिबट्याच्या हल्यात चार दिवसांत मोहरी गावात बिबट्याच्या हल्यात तीन जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
– चौकट – शेतकऱ्यांनी एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईलवर गाणे लावावी, शेळ्या,मेंढ्या,वासरी कुंपणाच्या आत लाईटच्या उजेडात ठेवाव्यात आवाजाच्या ध्वनी वापराव्यात संध्याकाळी लाईट वस्तीवरील चालू ठेवावी तसेच स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.