शिऊर गणात पंचायत समिती साठी नवा सर्वसमावेशक तरूण चेहरा समोर विकास नागनाथ तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक

0
645

जामखेड न्युज—–

शिऊर गणात पंचायत समिती साठी नवा सर्वसमावेशक तरूण चेहरा समोर

विकास नागनाथ तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक

नव्याने तयार झालेल्या शिऊर पंचायत समिती गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या गणात सर्वसमावेशक, युवकांचे संघटन असलेला तसेच आमदार रोहित पवार यांचा विश्वासू म्हणून ओळख असणारा विविध सामाजिक उपक्रमातून आपली ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व विकास नागनाथ तनपुरे हे शिऊर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. यामुळे तनपुरे च्या रूपाने सर्वसमावेशक नवा चेहरा समोर आला आहे.

विकास नागनाथ तनपुरे हे गेल्या सात वर्षापासून पंचायत समिती निवडणुकीची तयारी करत आहेत. आगोदर साकत गण होता आता नव्याने शिऊर गण झाला आहे. गणातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रायटिंग पँड वही पेन कंपास टिफिन वाटप करत ते घराघरात पोहचलेली तरूण चेहरा म्हणून त्यांच्या कडे पाहिजे जाते.

अनेक वर्षापासून वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. वाढदिवशी सकाळी रक्तदान शिबीर तर सायंकाळी किर्तन सोहळा कार्यक्रम आयोजित करत रक्तदान करणाऱ्यास ट्रँक शुटचे वाटप करतात.

अनेक सामाजिक उपक्रम
परिसरात विकास तनपुरे हे अनेक सामाजिक उपक्रम राबवितात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गरजूंना किराणा किट, धान्य व साडीवाटप करण्यात येते.


पाच वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील भाविक भक्तांना प्रसाद वाटप तसेच सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकारांचाप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो.

महापुरुषांचे विचार तरुणांमध्ये रुजविण्यासाठी पै. विकास तनपुरे प्रतिष्ठान शिऊर मार्फत तीन वर्षापासून शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या गडकिल्ल्यावरून गावात ज्योत घेऊन येऊन ऐतिहासिक कार्यक्रम याद्वारे महापुरुषांचे विचार तरुणांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. पै. विकास तनपुरे प्रतिष्ठान शिऊर मार्फत शिऊर फाट्यावर शिर्डी हैदराबाद महामार्गावर भव्य दिव्य अशी कमान करण्यासाठी पुढाकार घेत कमान केली यामुळे गावाची ओळख निर्माण झाली आहे.

विकास तनपुरे यांचे कोरोना काळातील कामही उल्लेखनीय आहे. लोकांमध्ये जनजागृती करत आर्सेनिक अल्बम व मास्क वाटप करण्यात आले होते. तसेच प्रत्येक वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करत विजेत्यांना बक्षिसे योग्य ते बक्षिसे देत विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण करतात. असे सर्व समावेशक नेतृत्व म्हणून विकास नागनाथ तनपुरे यांच्या कडे पाहिले जात आहे. शिऊर पंचायत गणासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here