जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची तडकाफडकी गडचिरोली जिल्ह्यात बदली बदलीचे आदेश येताच फटाक्यांची आतषबाजी

0
2417

जामखेड न्युज——

जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची तडकाफडकी गडचिरोली जिल्ह्यात बदली

बदलीचे आदेश येताच फटाक्यांची आतषबाजी

जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे तडकाफडकी बदली झाली आहे. माळी हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जामखेड मध्ये आले होते. अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडत होते. तसेच सर्व सामान्य नागरिकांशी बोलताना अनेक वेळा वादंग होत होते. यामुळेच बदली झाली की काय अशी चर्चा सगळीकडे आहे. बदलीचा आदेश येताच जामखेड शहरात काही हितचिंतकांनी फटाके वाजून बदलीचे स्वागत केले.

बदली आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पारपाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदींनुसार खाली नमूद केलेल्या तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बदली करण्यात येत आहे.


कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारु नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम१९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामूळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुध्दशिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल.

याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरउपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२५०७२९२०४६०९३८१९ असाआहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.


तहसीलदार गणेश माळी यांची बदली झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता जामखेड ला कोण येत आहे याची उत्सुकता लागली आहे.

चौकट

तहसीलदार गणेश माळी यांनी राजकीय दबावाखाली डॉ.भास्कर मोरे यांच्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अ.नगर या संस्थेचा रत्नदीप शैक्षणिक संकुल नियमबाह्यपणे व बेकायदेशीरपणे सील केला होता. शैक्षणिक संकुल सील करून विविध विद्यापीठांना संस्थेच्या तपासण्या करण्यास भाग पाडले व संस्थेवर असंलग्नीकरणाची कारवाई करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यास भाग पाडले होते. गणेश माळी यांनी राजकीय दबावाखाली विविध विद्यापीठांची व शासनाची दिशाभूल करून संस्थेवर कारवाई करण्यास भाग पाडले होते. गणेश माळी यांनी कोणत्या अधिकारात संस्था सील केली याची विचारणा करून मा.मुंबई उच्च न्यायालयाने देखील तीव्र आक्षेप नोंदवला होता.तसेच शासनाने नियुक्त केलेल्या विशेष चौकशी समितीला व समितीने दिलेला अहवालाला मा.उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here