जामखेड तालुक्यातील मोहरी येथे बिबट्याच्या हल्यात रात्री दोन जनावरे मृत्युमुखी पडले आहेत तीन दिवसांपूर्वी एका गायीवर बिबट्याने हल्ला केला होता यात गाय मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे चार दिवसांत मोहरी गावात बिबट्याच्या हल्यात तीन जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
जामखेड तालुक्यातील मोहरी येथे हरिभाऊ गोपाळघरे यांच्या घुगे वस्ती ठिकाणच्या गोठ्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून दोन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तीन दिवसापूर्वीच मोहरी येथील सुखदेव श्रीरामे यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला केल्याने ती गाय ही मरण पावली होती.
त्यामुळे खर्डा व मोहरी परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. मोहरी हा भाग डोंगरदऱ्याने वेढलेला आहे यापूर्वीही या परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकरीवर्ग जीव मुठीत धरून शेतामध्ये राबत आहे. याबाबत वनविभाग काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
– चौकट – शेतकऱ्यांनी एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईलवर गाणे लावावी, शेळ्या,मेंढ्या,वासरी कुंपणाच्या आत लाईटच्या उजेडात ठेवाव्यात आवाजाच्या ध्वनी वापराव्यात संध्याकाळी लाईट वस्तीवरील चालू ठेवावी तसेच स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.